Uddhav Thackeray Targets BJP Over Alleged Ram Mandir
esakal
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरीप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ रविवारी दादर येथे आयोजित करण्यात आलेल्या 'रामरक्षा आंदोलनात' त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपाच्या भूमिकेवर कठोर शब्दांत टीका केली. या आंदोलनात खासदार संजय राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.