Tree Cutting
sakal
कर्जत : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात टोरंट कंपनीच्या साई डोंगर-१ जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधात राजकीय वातावरण तापले आहे. स्थानिक ग्रामसभा आणि पर्यावरणप्रेमींनी यापूर्वी विरोध दर्शवूनही प्रकल्पाचे काम सुरू असल्याने नाराजी वाढली आहे. आदित्य ठाकरे, रोहित पवार यांच्यानंतर आता स्थानिक शिवसेनेच्या (ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत जंगल परिसरात निषेध नोंदवला.