Uddhav Thackeray : "तेव्हा फडणवीसांना सरकार पाडण्याची दिली होती धमकी"; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

अंगणवाडी सेविकांच्या मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी सांगितला युती सरकारच्या वेळचा किस्सा
Devendra Fadnavis and Uddhav Thackeray
Devendra Fadnavis and Uddhav Thackeray

मुंबई : ग्रॅच्युईटीसह विविध मागण्यांसाठी मुंबईतील अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी सांगितला युती सरकारमधील एक किस्सा सांगितला. त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना आपण सरकार पाडण्याची धमकी दिली होती, असा खुलासा त्यांनी केला. (Uddhav Thackeray was threatened to Devendra Fadnavis for topple government said in Anganwadi workers protest)

Devendra Fadnavis and Uddhav Thackeray
Nitish Kumar: नितीश कुमारांची लवकरच होणार इंडिया आघाडीच्या समन्वयकपदी नियुक्तीची घोषणा - सूत्र

मेस्मा लावालं तर....

उद्धव ठाकरे म्हणाले, "जेव्हा आम्ही युतीमध्ये होतो आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा अंगणवाडी सेविकांवर मेस्मा कायद्यानुसार कारवाई करणार होते. पण तेव्हा मी फडणवीसांना सष्टपणे सांगितलं होतं की, याद राखा या अंगणवाडी महिलांवर जर हा कायदा लावला तर मी सरकार पाडून टाकेन" (Marathi Tajya Batmya)

Devendra Fadnavis and Uddhav Thackeray
Kerala High Court: पतीने संमतीविरुद्ध लैंगिक संबंध ठेवल्यास पत्नीला घटस्फोटाचा अधिकार; न्यायालयाचा मोठा निर्णय!

तीन बांगड्या सरकारपेक्षा खेकडा बरा

आता तर जे तीन बांगड्या सरकार जुळलेलं आहे. त्यांचं एकमेकांच्या तंगड्यात तंगडं असं सुरु आहे, यांच्यापेक्षा खेकडा बरा पण हे सरकार नीट चालू शकणार नाही. हे सरकार बिघाडी सरकार फक्त स्वतःचे फोटो छापण्यात मग्न आहे, अशा शब्दांत शिंदे-फडणीवस सरकारवर टीकाही यावेळी ठाकरेंनी केली. (Latest Marathi News)

Devendra Fadnavis and Uddhav Thackeray
Sakshi Malik : ब्रिजभूषणच्या गुंडांनी आईला धमकी दिली; साक्षी म्हणते तुम्हीही विसरू नका की तुमच्या घरात...

रामलल्लाच्या दर्शनासाठी निमंत्रणाची गरज नाही

दरम्यान, मी सुद्धा जाणार आहे रामलल्लाच्या दर्शनासाठी जसं पूर्वी गेलो होतो. मला निमंत्रणाची गरज नाही, मी कधीही राम मंदिरात जाईल. पण दर्शन घेतल्यानंतर पुन्हा प्रश्न असाच येतो की, मी माझ्या घरी गेल्यानंतर माझ्या मुला-बाळांना काय देऊ. हे धार्मिक राजकारण करत असताना सरकारनं गोरगरीब जनेसाठी काय उपायोजना केल्या? असा सवालही यावेळी ठाकेरंनी उपस्थित केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com