उद्धवजी पक्षप्रमुख तर आदित्य कार्याध्यक्ष? शिवसेना ठाकरे गटात खांदेपालटाची चर्चा, वर्धापन दिनी घोषणेची शक्यता

Shivsena UBT शिवसेना ठाकरे गटात खांदेपालटाच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात २००३ प्रमाणे आताही पक्षप्रमुख पद असताना कार्याध्यक्ष पद निर्माण केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Aditya Thackeray
Aditya Thackeray Sakal
Updated on

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात खांदेपालटाची चर्चा सुरू आहे. यात शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष केलं जाण्याची शक्यता आहे. वर्धापन दिनी याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. १९ जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. याच दिवशी आदित्य ठाकरेंच्या कार्याध्यक्षपदाबाबत घोषणा होऊ शकते. २००३ मध्ये वर्धापन दिनी उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष म्हणून घोषणा केली होती. आता पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती होत असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com