उल्हासनगर : मुंब्रा ते भिवंडीपर्यंत विस्तारलेलं ‘एमडी ड्रग्स’चं जाळं उल्हासनगर गुन्हे शाखेच्या धडाकेबाज कारवाईत उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या कारवाईत तब्बल २६ लाख रुपयांचा मेफेड्रोन (MD) जप्त करण्यात आले असून एका महिलेपासून नायजेरियन नागरिकापर्यंत पाच आरोपींच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. ही धडक कारवाई आता सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे.