Ulhasnagar News : गुन्हे अन्वेषणच्या कारवाईत दोन गावठी हातभट्टी दारूचे अड्डे उध्वस्त, पावणेपाच लाखाचा मुद्देमाल नष्ट

चोरीछुपे सुरू असलेल्या दोन गावठी हातभट्टी दारूच्या अड्डयांवर उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी छापेमारी करून हे अड्डे उध्वस्त केले असून पावणेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट केला आहे.
crime news
crime newssakal

Ulhasnagar News : चोरीछुपे सुरू असलेल्या दोन गावठी हातभट्टी दारूच्या अड्डयांवर उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी छापेमारी करून हे अड्डे उध्वस्त केले असून पावणेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट केला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी छुप्या पध्दतीने,चोरीछुपे सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारूच्या अड्डयांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे.त्यानुसार हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगळूर गावात खदानीच्या माळरानात सुरू असलेला चंद्रकांत मढवी यांच्या गावठी हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त करण्यात आला आहे.

यावेळी 1 लाख 39 हजार रुपयांची जवळपास 2600 लिटर गावठी हातभट्टीची दारू जागीच नष्ट केली आहे.चंद्रकांत मढवी हा फरार झाला असून त्याच्या विरोधात हिललाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मानेरे गाव म्हसोबा मंदिराच्या पुढे गुरुचरण जागेमध्ये छापा टाकून गावठी हातभट्टी दारूच्या अड्डयावर कारवाई करण्यात आली.या कारवाईत कृष्णा भोईर हा गावठी हातभट्टी दारू गाळणीचा व बनवण्याचा व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.यावेळी 3 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असून तो जागीच नष्ट करण्यात आला आहे.

crime news
Crime News: भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी शोमा सेन यांची ६ वर्षांनी सुटका

या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आरोपी कृष्णा भोईर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या दोन्ही यशस्वी कारवाईमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेचे रमेश केंजळे,शेखर भावेकर,राजेंद्र थोरवे, योगेश वाघ,विक्रम जाधव,अर्जुन मुत्तलगिरी,संजय शेरमाळे सहभागी झाले होते.

crime news
Nashik Crime News : मोपेड चोरून 6 वर्षे वापरली! दोघा संशयितांच्या आवळल्या मुसक्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com