उल्हासनगर : लाच घेताना कनिष्ठ अभियंत्यास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

उल्हासनगर : लाच घेताना कनिष्ठ अभियंत्यास अटक

उल्हासनगर : नवे वीज मीटर बसवून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. यात एका प्रशिक्षणार्थी वायरमनचा समावेश आहे.

रवींद्र पाटील यांनी याप्रकरणी तक्रार दिली होती. पाटील हे महावितरणचे परवानाधारक ठेकेदार आहेत. त्यांनी श्रीमलंग भागात राहणाऱ्या सुलोचना पावशे यांच्या व्यावसायिक दोन गाळ्यांत वीज मीटर बसवून देण्याचे काम घेतले होते. महावितरणचे कनिष्ठ अभियंता बसवराज बाबनगरे यांच्याकडे या परिसराचा कार्यभार असल्याने त्यांनी प्रशिक्षणार्थी वायरमन गणेश दळवी यांच्यामार्फत मीटर बसवून देण्यासाठी पाटील यांच्याकडे पाच हजार रुपयांची मागणी केली होती.

हेही वाचा: नवी मुंबई : लाच मागितल्याप्रकरणी दोन पोलिसांवर गुन्हा

लाच प्रतिबंधक विभागाच्या महिला पोलिस निरीक्षक सुषमा पाटील यांनी नेवाळी फाट्यावर सापळा रचून बाबनगरे यांच्यावर कारवाई केली.

loading image
go to top