उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी उल्हासनगर महानगरपालिकेने जय्यत तयारी सुरु केली आहे. महापालिका प्रशासक तथा आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत नुकत्याच झालेल्या बैठकीत शहरातील पायाभूत सुविधा, सुरक्षा, पर्यावरण आणि मंडळांना आवश्यक सुविधा पुरवण्याबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.