उल्हासनगर महानगरपालिकेवर फडकला शिवसेनेचा भगवा

उल्हासनगर महानगरपालिकेवर फडकला शिवसेनेचा भगवा

उल्हासनगर - महानगरपालिकेची स्थापना 1996 साली झाल्यापासुन 2017 मध्ये प्रथमच महापौरपद भाजपाला मिळाले. पण विधानसभेला भाजपाने उमेदवारी नाकारून गेम केल्याचा राग मनात धरून ओमी कालानी हे छातीठोकपणे शिवसेने सोबत आल्याने भाजपावर अवघ्या अडीच वर्षातच महापौर पदावरुन पायउतार होण्याची नामुश्की ओढवली आहे.शिवसेनेच्या लीलाबाई आशान यांची 43 मते मिळवून महापौर पदावर निवड झाल्याची घोषणा पिठासीन अधिकारी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी करताच, महानगरपालिकेच्या बाहेर शिवसैनिक, टीम ओमी कालानी समर्थक, राष्ट्रवादी,कॉंग्रेस, रिपाइ आठवले गटाने एकच जल्लोष केला.

पलिकेवर कालपर्यंत भाजप, टीम ओमी कलानी आणि साईपक्ष (सेक्युलर अलायंस ऑफ इंडिया) या आघाडीची सत्ता होती. या आघाडीकडे  44 संख्याबळ होते. तर शिवसेनेकडे 25,राष्ट्रवादी 4,रिपाइ 4 व कॉंग्रेस 1 असे केवळ 34 पक्षीय बलाबल होते. जागा होत्या. सत्तास्थापनेसाठी किमान 40 असा मॅजिक फिगर हवा होता. त्यासाठी ओमी कालानी यांनी भाजपाने विधानसभा निवडणुकीत दिलेल्या विश्वासघाताचा वचपा काढण्यासाठी शिवसेने सोबत हातमिळवणी केली. ओमी कालानीच्या 10 नगरसेवकां सोबत त्यांची पत्नी पंचम कलानी ह्या शिवसेनेच्या नगरसेवकां सोबत बसल्या. आणि इथेच पराभव स्पष्ट दिसू लागल्याने भाजपाच्या तोंडचे हास्य हरपले.भाजपाचे नगरसेवक-सेविका ह्या शिवसेने सोबत बसल्यात यावरून स्विकृत नगरसेवक मनोज लासी,प्रदिप रामचंदानी सभागृह डोक्यावर घेऊन पिठासीन अधिकारी राजेश नार्वेकर यांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. त्यावर शिवसेना नगरसेवक धनंजय बोडारे, राजेंद्र चौधरी यांनी ही विशेष महासभा आहे, कुणी कुठेही बसू शकतो असे सांगितले तर पंचम कालानी यांनी देखील शिवसेनेची बाजू घेतली.

या गोंधळात काही मिनिटे खर्ची झाल्यावर हात उंचवून करण्यात आलेल्या महापौरासाठीच्या मतदानात शिवसेनेच्या लीलाबाई आशान यांना 43 तर साईपक्षाचे जीवन इदनानी यांना 35 मते मिळाली.उपमहापौर मध्ये शिवसेना-टीम ओमी कालानी सोबत असलेले रिपाइ आठवले गटाचे भगवान भालेराव यांना 44 व भाजपाचे विजय पाटिल यांना 34 मते मिळाली.2017 पासून शिवसेने सोबत असलेल्या भारिप ने महापौर निवडणुकीत त्यांचे एक मत हे साईपक्षाला दिल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

"भाजपाच्या नादी लागणारा साईपक्षही सत्तापार"

पप्पू कलानीच्या एकाधिकारशाहिला कंटाळून 2007 पासून विभक्त झालेल्या एका गटाने साई पक्षाची निर्मिती करून 2007, 2012, 2017 साली सलग उल्हासनगर महापालिकेत सत्तेचा वाटा घेतला. सन 2007 आणि 2012 मध्ये साई पक्ष शिवसेनेसोबत असताना त्यांना महापौर, स्थायी समिती सभापती पदाचा मान मिळाला होता. मात्र 2017 च्या पालिका निवडणुकीनंतर साई पक्षाने भाजपसोबत युती केली. टिम ओमी कलानीच्या नगरसेवकांच्या बळावर 1996 नंतर प्रथमच भाजपाच्या महापौर म्हणून मीना आयलानी यांना मान मिळाला.तर साईपक्षाचे जीवन इदनानी उपमहापौर झाले. पण अडीच वर्षानंतर महापौर पद मिळणार अशा साईला दिलेल्या आश्वासनाला भाजपाने नकार दिल्याने साई पक्षाने देखील महापौराच्या रिंगणात उडी घेतली.त्यामुळे फुट पडण्याचे चित्र दिसू लागताच,साईपक्षाचे भाजपात विलीनीकरणाची आणि महापौर पदावर निवडून आनन्याची खेळी खेळण्यात आली. साईपक्षाचे उमेदवार असल्याने जीवन हे एका नगरसेवकासोबत साईपक्षात राहिले.मात्र त्यांनी 10 नगरसेवकांना भाजपाच्या दावनीला बांधले. महापौराच्या निवडणुकीत जीवन इदनानी यांचा एकीकडे दारुण पराभव झाला असतानाच 2007 पासून सत्तेत असलेला साईपक्षही त्यामुळे सत्तापार झाला आहे.

यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटिल,खासदार डॉ. प्रकाश पाटिल, आमदार रविंद्र फाटक, शांताराम मोरे,उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे,अंबरनाथच्या नगराध्यक्ष मनिषा वाळेकर,बदलापुरचे शहरप्रमुख वामन म्हात्रे,राष्ट्रवादीचे आनंद परांजपे,कॉंग्रेसचे डॉ. जयराम लुल्ला, राधाचरण करोतियह,ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख जयकुमार केणी,उपशहरप्रमुख राजेंद्र साहू,दिलीप गायकवाड, युवासेना उपजिल्हाधिकारी सोनू चानपुर,अधिकारी बाळा श्रीखंडे उपस्थित होते.

Webtitle : ulhasnagar municipal corporation mayor election results details

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com