

Ulhasnagar Municipal Corporation elections
ESakal
ठाणे : उल्हासनगर पालिकेच्या निवडणुकीत महायुती फिस्कटल्याने शिवसेना, टीम ओमी कलानी व साई पक्षाची आघाडी आणि भाजपमध्ये थेट लढत झाली. त्यामुळे दोन्ही पक्षांना प्रत्येकी ३७ जागा मिळाल्या. वंचितला दोन आणि काँग्रेसने केवळ एका जागेवर विजय मिळविला आहे. ठाकरे बंधूंना खातेही उघडता आले नाही; मात्र तरीही सत्तेचे गणित जुळवण्यासाठी काँग्रेस, वंचित आणि इतरांची भूमिका निर्णायक असणार आहे.