Ulhasnagar News : पाय घसरून खदानीत बुडून एकाचा मृत्यू

उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसार गाव येथील खदान मध्ये बुडून एका 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
Drown
DrownSakal

उल्हासनगर - उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसार गाव येथील खदान मध्ये बुडून एका 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. खदान परिसरात बुधवारी चार तरुण पोहण्यासाठी गेले होते. मात्र पाय घसरून चंदन उर्फ बाबासाहेब झा याचा जागीच मुत्यू झाला असल्याची अशी माहिती त्याच्या सहकाऱ्यांनी पोलिसांना दिली आहे. घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केला आहे.

कल्याण पूर्वेतील मलंगगड भागात असलेल्या वसार गावाजवळील सुखाला मैदान येथे एक खदान आहे. या परिसरात वसार येथील गणेश नगर परिसरात राहणारा चंदन झा हा तरुण आपल्या मित्रांसह पोहायला गेला होता. मात्र चंदनाचा पाय घसरून तो थेट खदान मध्ये पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

मुसळधार पावसात खदान मध्ये पाणी देखील अधिक असल्याने चांदनला वाचवणे त्याच्या सहकाऱ्यांना शक्य झालं नाही. त्यामुळे चंदनाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. चंदनचा मृतदेह हिललाईन पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तपासाला सुरुवात केली आहे. घटनेची माहिती चंदन झा याच्या कुटुंबियांना देण्यात आली असून कुटुंबीयांनी देखील उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात धाव घेतली आहे. सध्या हिललाईन पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com