यशस्वी उपचारानंतरही कुटुंबीय त्यांना स्वीकारत नाहीये!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 मार्च 2020

क्षयरोगावरील यशस्वी उपचारानंतर रुग्णालयाने घरी जाण्यास परवानगी दिलेल्या दीडशेहून अधिक क्षयरोगाच्या रुग्णांची अवहेलना होत आहे. स्वतःच्या कुटुंबीयांनी या रुग्णांवर अघोषित बहिष्कार टाकल्याने त्यांच्यावर रुग्णालयातच खितपत पडून राहण्याची वेळ आली आहे.

मुंबई : क्षयरोगावरील यशस्वी उपचारानंतर रुग्णालयाने घरी जाण्यास परवानगी दिलेल्या दीडशेहून अधिक क्षयरोगाच्या रुग्णांची अवहेलना होत आहे. स्वतःच्या कुटुंबीयांनी या रुग्णांवर अघोषित बहिष्कार टाकल्याने त्यांच्यावर रुग्णालयातच खितपत पडून राहण्याची वेळ आली आहे.

ही बातमी वाचली का? पीएमसी बॅंक गैरव्यवहार प्रकरणी माजी संचालकासह तिघांना अटक

क्षयरोगावरील उपचारासाठी शिवडीतील पालिकेच्या टीबी रुग्णालयाची ओळख आहे. या रुग्णालयात १२०० खाटांची व्यवस्था आहे. सध्या ४९८ क्षयरोगाच्या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही रुग्ण नव्याने भरती होत आहेत; तर काही रुग्ण दोन ते तीन वर्षांपासून या रुग्णालयात आहेत. यापैकी १५३ रुग्णांवर उपचार पूर्ण झाले असून त्यांना घरी जाण्यास परवानगी आहे. केवळ त्यांना घरी गेल्यावर नियमित औषधे घ्यावी लागतात. या रुग्णांना घरी जाण्याची ओढ लागली असली तरी त्यांचे कुटुंबीय त्यांना घरात घ्यायला तयार नाहीत. बाधित रुग्णांना घरात घेतल्यास आपल्यालाही क्षयरोगाचा संसर्ग होण्याची भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळे काही रुग्ण तर गेल्या पाच वर्षांपासून रुग्णालयात राहत आहेत. 

ही बातमी वाचली का? कोरोनाच्या दहशतीमुळे ...ही निवडणूक ढकलली पुढे!

शिवडीच्या टीबी रुग्णालयात दररोज क्षयरोगाचे सरासरी ४० रुग्ण दाखल होतात. या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये ७२ टक्के पुरुष; तर २७ टक्के महिला रुग्ण आहेत. त्यात मुंबईतील ५१ टक्के, इतर जिल्ह्यातील १३.८८ टक्के; तर राज्याबाहेरील रुग्णांचे प्रमाण ३४.७२ टक्के आहे. 

ही बातमी वाचली का? कोरोनामुळे अडलंय हापूसचं  घोडं, वाचा काय झालंय... 

क्षयरोगावर योग्य उपचार उपलब्ध असून तो पूर्णपणे बरा होणारा आजार आहे; मात्र या आजाराबाबत लोकांमध्ये भीती आणि गैरसमज आहे. क्षयरुग्णाला उपचारानंतर घरी नेल्यास आपल्यालाही क्षयरोगाचा संसर्ग होईल, अशी भीती त्यांना असते. त्यामुळे काही नातेवाईक त्यांना घरी न्यायला तयार नाहीत. त्याशिवाय काही रुग्णांना आपण घरी गेल्यास आपल्याला योग्य वागणूक मिळणार नाही, अशी भीती वाटते. त्यामुळे ते स्वतःहून घरी जायला तयार नाहीत. अशा सर्व रुग्णांसाठी सहानुभूतीने रुग्णालयातच निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Undeclared exclusion of family members on TB

टॅग्स