नोकरीवरचं विघ्न 'विघ्नहर्त्यानेच' टाळलं, तरुणांनी असा केला व्यवसायाचा 'श्रीगणेशा'

ganpati idol
ganpati idol

खर्डी : कोरोनामुळे राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केले. या लॉकडाऊनमध्ये अनेक तरुणांचे रोजगार गेले. शहापुरातील रोजगार गेलेल्या अशाच तरुणांनी निराश न होता गणेशमीर्ती बनवून आपला आणि आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह सुरू केला आहे. गणेश बाप्पाच्या कृपेने पुन्हा आपल्या हे काम करत असल्याची भावना या दोन तरुणांची आहे. शुभम चौधरी आणि सुमीत शेट्टी अशी या तरुणांची नावे आहेत. 

शहापूर येथील सुमीत शेट्टी एका मोठ्या हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करीत होते; तर शुभम चौधरी एका खासगी कंपनीत कामाला होता. सर्व आलबेल असतानाच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्याने या दोघांचेही काम गेले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला उपासमारीला सामोरे जायची पाळी आली होती; परंतु सुमीत याने 5 वर्षांपूर्वी गणपती कारखान्यात काम केले असल्याने त्याला मूर्ती बनवायचा अनुभव होताच. याचाच फायदा घेत मित्र सुमेध जाधव याचे सहकार्य घेऊन सुमीत व शुभम यांनी गणेश मूर्ती बनवून प्रदर्शन व विक्री व्यवसाय सुरू केला. 

- सोशल माध्यमातून जाहिरात 
सुमीत आणि शुभम यांनी व्यवसाय सुरू केल्यानंतर पेण येथून गणेशमूर्तींचे कच्चा माल आणून विविध प्रकारच्या मुर्त्या बनवायचे काम सुरू केले. सोशल मीडियावर बनवलेल्या मूर्तींची जाहिरात केली. त्याला ग्राहकांचादेखील भरघोस प्रतिसाद मिळाला. 6 इंच ते 4 फुटापर्यंत मूर्ती बनवून विक्रीसाठी ठेवल्या आहेत. त्याची कीमत 1200 रुपयांपासून 21 हजार रुपयांपर्यंत आहेत. "फेटा घातलेल्या गणपती बाप्पाची मूर्ती' हे दोघांनी बनवलेल्या आकर्षक मूर्तीसाठी प्रसिद्ध झाले आहेत. 

- गुजरात, औरंगाबादमधून मागणी 
सोशल मीडियावरील जहिरातीमुळे गुजरात, औरंगाबाद, जालना, ठाणे व कल्याण येथून या गणेश मुर्त्यांना मागणी आली आहे. तसेच शहापूर परिसरातील गणेश भक्तांचीही त्यांच्याकडे मुर्त्याखरेदीसाठी गर्दी होते आहे. शहापुर येथील कस्तूरी प्लाझा, तावडे नगर येथे दुकान असून या गणेश मुर्त्याच्या व्यवसायामुळे आम्हाला रोजगार उपलब्ध झाला असल्यानेआम्हाला गणपती बाप्पा पावला असून आमच्यावरील बेरोजगारीच विघ्नहर्त्या गणपती बाप्पाने दूर केले असल्याचे सुमीत व शुभम यांनी सांगितले. 

(संपादन : वैभव गाटे)

unemployed friends start business of ganpati idol selling in mumbai

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com