esakal | पालघर जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली, धामणी धरण तुडूंब
sakal

बोलून बातमी शोधा

dhamani dam

सूर्या नदीचा पातळी वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नदी किनारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देत नदी किनारी मासेमारी न करण्याचे आवाहन देखील केले आहे. 

पालघर जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली, धामणी धरण तुडूंब

sakal_logo
By
महेंद्र पवार

कासा : डहाणू तालुक्‍यातील प्रमुख मानले जाणारे धामणी धरण अखेर रविवारी पूर्ण भरले. त्यामुळे रविवारी धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या धरण क्षेत्रात सतत जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू असून पाणीसाठ्यामध्ये वाढ होत आहे.

हेही वाचाः  'या' पुलावरून प्रवास करत असाल तर सावधान, पालिकेनं केलं आवाहन

धामणी धरणातून डहाणू, पालघर, विक्रमगड तालुक्‍यातील अनेक गावांना सिंचनासाठी पाणी पुरवठा केला जातो. त्याचबरोबर वसई-विरार नगरपालिका, तारापूर, बोईसर येथील औद्योगिक वसाहतीना देखील पाणीपुरवठा होतो. यामुळे यंदाच्या पावसाने पालघर जिल्ह्यातील नागरिकांची पुढील वर्षांची पाण्याची चिंता मिटली आहे.

अधिक वाचाः  मुंबईकरांनो काळजी घ्या! येत्या बुधवारपर्यंत 'ही' असेल पावसाची स्थिती...ठाणे, पालघरही अलर्टवर

धामणी धरण 96.22 टक्के भरले आहे. रविवारी सकाळी 11 वाजता 1.5 फूट धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून 4655.62 क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. तर कवडास धरण 100 टक्के भरले असून त्यातून 1061 क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत होत आहे. त्यामुळे सूर्या नदीचा पातळी वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नदी किनारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देत नदी किनारी मासेमारी न करण्याचे आवाहन देखील केले आहे. 

ही बातमी वाचली का? सावधान! कोरोनानंतर मुंबईवर आणखी एक संकट घोंघावतय

धामणी धरण - 

  •    पाणीसाठा          -            उपयुक्त साठा 

           118.60 मिटर        -       276.350 द. ल.घ.मी. 

  • पाणीसाठा पातळी    -              पाणीसाठा 
  •     (रविवार) - 

           117.75 मिटर         -       274.876 द. ल.घ.मी. 

(संपादन : वैभव गाटे)

palghar districts water concern is over Dhamani dam is overflowing

loading image
go to top