esakal | Budget 2020 : निर्मला सीतारामन लाल पिशवीतून का आणतात अर्थसंकल्पाची कागदपत्रे ?
sakal

बोलून बातमी शोधा

Budget 2020 : निर्मला सीतारामन लाल पिशवीतून का आणतात अर्थसंकल्पाची कागदपत्रे ?

Budget 2020 : निर्मला सीतारामन लाल पिशवीतून का आणतात अर्थसंकल्पाची कागदपत्रे ?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत अर्थसंकल्प सादर करतायत. २०२०-२०२१ चा हा अर्थसंकल्प या दशकातील पहिला अर्थसंकल्प आहे. भारतासमोर मोठे प्रश्न उभे ठाकलेत. अशात भारताला मंदीच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी निर्मला सीतारामन यांचा आजचा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

भारतातील युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांसमोरील सर्व प्रश्न दूर करणे, शेतीक्षेत्रात नवीन इन्व्हेस्टमेंट आणणं, भारतातील उद्योगधंद्यांना उभारी देणं अशा महत्त्वाच्या प्रश्नावर काय निर्णय घेतले जातायत हे पाहणं महत्त्वाचं आहे.

मोठी बातमी - शरद पवार म्हणतात 'हे जेवण आयुष्यभर लक्षात राहील'

या आधीचे अर्थसंकल्प आपण पाहिलेत. अर्थमंत्री कायम एका ब्रिफकेसमधून अर्थसंकल्पाची कागदपत्रे घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळालेत. मात्र मागील वर्षांपासून निर्मला सीतारामन यांनी मागील वर्षांपासून कापडी पिशवीतून ही कागदपत्रे आणणं सुरु केलंय. दरम्यान आजही भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन एका लाला रंगाच्या कापडी पिशवीतून अर्थसंकल्पीय कागदपत्रे घेऊन आल्या. नरेंद्र मोदी सरकारच्या काळात ब्रिफकेसची देवाण घेवाण होत नाही म्हणत, हा नवीन पायंडा निर्मला सीतारामन यांनी पाडलाय. 

मोठी बातमी - सीएएविरोधातील नाट्य सादर केल्याने चौथीतल्या मुलांवर देशद्रोहाचा गुन्हा! 

निर्मला सीतारामन या भारतातील पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. निर्मला सीतारामन यांचं यंदाचं अर्थसंकल्प सादर करण्याचं दुसरं वर्ष आहे. याआधी 1969 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अर्थमंत्री म्हणून पदभार स्वीकारला, मात्र त्या पूर्णवेळ अर्थमंत्री नव्हत्या. निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करणाऱ्या दुसऱ्या भारतीय महिला आहेत. 

union budget 2020 why finance minister nirmala sitharaman brings budget document in red cotton bag