Narayan Rane : कोकण रेल्वेच्या समस्या सोडवण्यासाठी राणेंनी घेतली रेल्वे मंत्र्यांची भेट!

Narayan Rane
Narayan Rane

मुंबई :गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी जादा गणपती विशेष गाड्या सोडण्याचा मागणीसह कोकणातील रेल्वे प्रवाशांचा विविध समस्यांवर बुधवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यामध्ये चर्चा झाली आहे. रेल्वे मंत्र्यांनी कोकणातील रेल्वे प्रवाशांचा मागण्यांकडे सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Narayan Rane
Crime News : दुबईला साखर निर्यातीच्या बहाण्याने दीड कोटींची फसवणूक; आरोपी पुण्यातील डॉक्टर

गणेशोत्सवानिमित्त मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून लाखो चाकरमानी कोकणात जातात. मात्र त्यांना रेल्वेचे कन्फर्म टिकीट मिळवताना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच एका मिनिटात गाड्यांचे बुकिंग फुल होत असल्याने अनेकांच्या हाती वेटींगचे तिकीट पडत आहेत. तसेच दलालांच्या रॅकेटमुळे कोकणातील गाडीचे बुकिंग सुरू होताच फुल होत असल्याचे आरोपही रेल्वेवर होत आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची बुधवारी दिल्लीत भेट घेतली. गणेशोत्सव तिकीट बुकिंग बाबत आरोपांसंदर्भात व अधिकच्या उत्सव विशेष रेल्वे गाड्यासह कोकणातील प्रवाशांचा मागण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे. रेल्वे मंत्र्यांनी कोकणातील रेल्वे प्रवाशांचा मागण्यांकडे सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Narayan Rane
Dr. Lahane Resigns: डॉ. लहाने, पारेख यांच्यासह 9 डॉक्टरांचे राजीनामे; नेमकं काय घडलंय वाचा?

गणेशोत्सव तिकिट आरक्षण बाबत आरोपांसंबंधात तसेच अधिकच्या उत्सव विशेष गाड्यासंदर्भात योग्य तो मार्ग काढण्याबाबत रेल्वे मंत्र्यांनी आश्वस्त केले. तुतारी एक्सप्रेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नादंगाव स्टेशनवर थांबविण्यात येईल. कोकण रेल्वेवरील वंदे भारत सेवेला कणकवली येथे धांवा देण्याचा निर्णय झाला आहे असे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले.

याशिवाय पडवे येथील रेल्वेचा अंडरपास बांधण्याच्या प्रस्तावास रेल्वे मंत्र्यांनी मान्यता दिली. कोकणच्या पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मिनी टॉय ट्रेन बाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com