हजारो प्राचीन दिव्यांचा अद्वितीय संग्रह! मकरंद करंदीकर यांचा वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाकडून गौरव

हजारो प्राचीन दिव्यांचा अद्वितीय संग्रह! मकरंद करंदीकर यांचा वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाकडून गौरव

घाटकोपर ः मकरंद शांताराम करंदीकर हे गेली 52 वर्षे दिव्यांचा-विशेषत: भारतीय दिव्यांचा संग्रह करीत आहेत. त्यांच्याकडील हा संग्रह भारतातील दिव्यांचा सर्वात मोठा संग्रह आहे. आज सुमारे 1000 हून अधिक विविध दिवे या संग्रहात आहेत. त्यांच्या विक्रमी संग्रहाची नोंद घेण्यात आली असून वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाने त्यांना शुक्रवारी पार्ले येथे सन्मानित केले. 

भारतातील विविध राज्यांतील आणि सर्व धर्मांमध्ये वापरले जाणारे चांदी, पितळ, तांबे, जर्मन, सिल्वर, चिनी माती, दगड, काच, लाकूड, लोखंड, कागदाचा लगदा, ऍल्युमिनियम, पंचधातू, कांस या धातूंपासून तयार करण्यात आलेले दिवे, तसेच विदेशातीलही अनेक आगळ्यावेगळ्या दिव्यांचा करंदीकर यांच्या या संग्रहात समावेश आहे. 

या संग्रहात काही आगळेवेगळे दिवे असून अचानक उलट-सुलट कसाही फिरवला तरीही न विझणारा "कंदुकदीप', अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा, सर हंफ्रेडेव्हीचा संरक्षक दीप, कापालिक गणेश आणि भोवती 12 दिवे, तळाशी पंखा फिरवत ठेवून त्याद्वारे दिव्याला प्राणवायूचा पुरवठा करण्याची खास सुविधा असलेला दिवा, जखमी सैनिकावर उपचारासाठी तत्काळ सुई उकळून निर्जंतूक करणारा डॉक्‍टरांच्या खिशातला दिवा, रेल्वेगाड्यांचे सिग्नलचे जुने व बोटीवरचे दिवे, वाराणसीतील गंगेच्या आरतीचे दिवे, केरळातील गुरुशिष्यदीप असे अनेक दिवे मकरंद करंदीकर यांनी अंधेरी येथील आपल्या घरी संग्रहित ठेवले आहेत. 

करंदीकर यांच्या अद्वितीय संग्रहाची वर्ल्ड रेकॉर्ड इंडियातर्फे नोंद घेण्यात आली आहे. वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचे संस्थापक व संचालक पावन सोलंकी यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचे वरिष्ठ मुंबई रिप्रेझेंटेटिव्ह संजय नार्वेकर आणि सुषमा तांबडकर यांच्याकडून मकरंद करंदीकर यांना प्रमाणपत्र, मेडल आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. 

भडभडे, समई यांचाही समावेश - 
विविध प्रकारच्या समई, पणत्या, लामणदिवे, आरत्या, झुंबरे, छताला आणि भिंतींवर टांगायचे विविध दिवे, चिमण्या, मशाली, दिवट्या, ठाणवई, भडभडे इत्यादींचे असंख्य प्रकारचे दिव्यांच्या संग्रह करंदीकर यांच्याकडे आहे. यात कुठेही मेणबत्त्यांचे स्टॅंड्‌स आणि विद्युतदिव्यांचा अंतर्भाव नाही

A unique collection of thousands of ancient lamps Makrand Karandikar honored by World Record India  

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com