काय सांगता ! चक्क पोलिस ठाण्यात मजूरांची वैद्यकीय तपासणी

medical check up
medical check up
Updated on

खारघर : लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी जाताना ई-पाससाठी वैद्यकीय दाखल्याची गरज लागते. त्यामुळे खारघर पोलिसांनी वैद्यकीय दाखल्यासाठी ठाण्यातच डॉक्टर उपलब्ध करून दिल्याने कामगार समाधान व्यक्त करत आहे.

राज्य आणि परराज्यातील मजुरांना गावी जाण्यासाठी ऑनलाईन ई-पास मिळवण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यामुळे दीड महिन्यापासून लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांनी वैद्यकीय दाखल्यासाठी खासगी रुग्णालयात धाव घेतली. मजुरांची परिस्थिती समजून न घेता काही डॉक्टर रोख रक्कम घेऊन वैद्यकीय दाखला देत होते. डॉक्टर मजुरांकडून पैसे  उकळत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती.
वैद्यकीय दाखल्यासाठी कामगारांची होणारी धावपळ लक्षात घेता आणि सोशल डिस्टन्सिंग पाळला जावा हा हेतू खारघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी पालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधला आणि पोलिस ठाण्यात डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी केली. आज मंगळवारी दुपारी तीनपर्यंत डॉक्टरांनी 150 मजुरांची तपासणी करून वैद्यकीय दाखले उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे अडकून पडलेल्या मजुरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

खारघर पोलिस ठाण्यात जवळपास चार हजार कामगारांचे अर्ज प्राप्त झाले आहे. डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र जसजसे उपलब्ध होत आहे, तशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवली जात आहे, अशी माहिती खारघर पोलिसांनी दिली.

खारघर परिसरात काही डॉक्टर वैद्यकीय दाखल्यासाठी शुल्क आकारत आहेत. परंतु, खारघर पोलिसांनी ठाण्यात वैद्यकीय दाखल्यासाठी डॉक्टर उपलब्ध करून दिल्याने मजुरांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे. तसेच सोशल डिस्टन्स पाळत कामगार याचा लाभ घेत आहेत.
- डॉ. वैभव बदाने, पदाधिकारी,
खारघर डॉक्टर असोसिएशन खारघर

खारघर परिसरात काही डॉक्टरांनी गोरगरीब मजुरांना वैद्यकीय दाखला देण्यासाठी धंदा मांडला होता. खारघर पोलिसांनी ठाण्यातच डॉक्टरची सेवा उपलब्ध करून दिल्याने मजुरांमध्ये समाधान आहे.
- विजय पाटील, अध्यक्ष, 
खारघरचा राजा चॅरिटेबल ट्रस्ट

A unique initiative of Kharghar police, Medical examination of laborers at the police station

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com