Maharashtra University Act Amendment Bill
ESakal
मुंबई
उच्च शिक्षण आयोगाला नवीन अधिकार मिळणार! महाराष्ट्र विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक सादर; हे नेमके काय आहे अन् तरतुदी कोणत्या?
Maharashtra University Act Amendment Bill News: महाराष्ट्र उच्च शिक्षण आयोगाला नवीन अधिकार मिळणार आहेत. विद्यापीठ योजनांमध्ये सुधारणा करू शकणार आहे. याबाबत विधेयक सादर केले आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, २०१६ मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी विधानसभेचे विधेयक क्रमांक ९८, २०२५ महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयात सादर करण्यात आले आहे. या विधेयकाचे उद्दिष्ट राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० प्रभावीपणे अंमलात आणणे आणि उच्च शिक्षण आणि संशोधनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी विद्यापीठांचे प्रशासन आणि रचना मजबूत करणे आहे. मंत्री पाटील यांनी सादर केलेल्या महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे (सुधारणा) कायदा, २०२५ नावाच्या या प्रस्तावित दुरुस्तीमध्ये अनेक महत्त्वाच्या तरतुदी आहेत.

