मुंबई विद्यापीठाच्या विविध परीक्षांचे निकाल लागले, आयडॉलचेही निकाल जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई विद्यापीठाच्या विविध परीक्षांचे निकाल लागले, आयडॉलचेही निकाल जाहीर

आजपर्यंत विद्यापीठाने 206 निकाल जाहीर केले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) शैक्षणिक वर्ष 2019-20 च्या तृतीय वर्ष बी.कॉम. व बी.ए. परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या विविध परीक्षांचे निकाल लागले, आयडॉलचेही निकाल जाहीर

मुंबई, ता. 12 : मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या अंतिम वर्ष पदव्युत्तर एमकॉम सत्र 4 चा निकाल बुधवारी (ता.11) रात्री जाहीर करण्यात आला आहे. तसेच आयडॉलने तृतीय वर्ष बीकॉम आणि बी ए परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. हे निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहेत.

अंतिम वर्ष पदव्युत्तर एम. कॉम. सत्र 4 चा परीक्षेचा निकाल 94.70 टक्के लागला आहे. या परीक्षेत एकूण 6 हजार 945 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला 9 हजार 74 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8 हजार 967 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. तर 107 विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच 389 विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षांचे निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

महत्त्वाची बातमी ग्रीन फटाक्यांतही आढळलेत धोकादायक केमिकल्स, लहान मुलांपासून असे फटाके दूरच ठेवा

आजपर्यंत विद्यापीठाने 206 निकाल जाहीर केले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) शैक्षणिक वर्ष 2019-20 च्या तृतीय वर्ष बी.कॉम. व बी.ए. परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यातील तृतीय वर्ष बी.कॉम. परीक्षेचा निकाल 87.3 टक्के लागला आहे. बी.कॉम. परीक्षेत 2 हजार 89 विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ग प्राप्त केला आहे. तर 664 विद्यार्थ्यांनी व्दितीय वर्ग प्राप्त केला आहे. 655 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला 6 हजार 231 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 5 हजार 893 एवढे विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. तर 338 विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच 508 विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत.

आयडॉलच्या तृतीय वर्ष बी. ए. परीक्षेचा निकाल 91.47 टक्के लागला आहे. बी. ए. परीक्षेत 2 हजार 46 विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ग प्राप्त केला आहे. 431 विद्यार्थ्यांनी व्दितीय वर्ग प्राप्त केला आहे तर 215 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला 3 हजार 27 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 3 हजार 589 एवढे विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. तर 200 विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच 251 विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत.

महत्त्वाची बातमी "खेळ तर आता सुरु झाला आहे उद्धव ठाकरे", जेलमधून बाहेर आल्यानंतर अर्णब यांची प्रतिक्रिया

परीक्षा अर्ज भरण्यास सुरुवात

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षेचे अनेक महत्वाचे निकाल जाहीर झाले आहेत. यानुसार मुंबई विद्यापीठाने 2020 मध्ये व्दितीय ( हिवाळी ) सत्राच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाविद्यालयाने परीक्षा अर्ज ऑनलाईन भरण्याची व ते फॉर्म विद्यापीठात दाखल करण्याची तारीख 11 ते 28 नोव्हेंबर 2020 ही असून विद्यापीठाकडे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 1 डिसेंबर 2020 ही आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज दाखल करण्यापूर्वी महाविद्यालयांनी संबधित विद्यार्थ्यांचे छायाचित्र, स्वाक्षरी, नाव ( मराठी व इंग्रजी या दोन्ही लिपीत ), माध्यम,परीक्षा केंद्र,विषय व दिव्यांग इ. बाबी बरोबर आहेत,याची खात्री करून घ्यावी. सदर माहिती गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र यासाठी वापरण्यात येणार आहे.

( संपादन - सुमित बागुल )

university of mumbai declaired results idol results are also declared

loading image
go to top