मुंबई : विद्यापीठ सुधारणा विधेयक राजभवनातच

राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची अद्याप स्वाक्षरी नाही; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री हतबल
उदय सामंत
उदय सामंतe sakal
Updated on

मुंबई: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्य हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मध्ये सुधारणा करणारे विधेयक राज्य विधिमंडळात मंजूर करून घेतले; मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सही न केल्याने हे विधेयक राजभवनात अडकून पडले आहे. त्यामुळे मंत्रीही हतबल झाले आहेत. याच संधीचा फायदा घेत भाजपशी जवळीक असलेल्या विद्यार्थी, शिक्षक आणि प्राध्यापक संघटनांनी या विधेयकाविरोधात पुन्हा एकदा रान पेटवायला सुरुवात केली आहे.

उदय सामंत
Mumbai : संजय पांडे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

सामंत यांनी हिवाळी अधिवेशनात मंजूर केलेल्या विद्यापीठ सुधारणा विधेयकाच्या विरोधात आज मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलात अभाविपने जोरदार

घंटानाद करून विद्यापीठ स्वायत्तता बचाव आंदोलन छेडले. चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात या सुधारणा विधेयकाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा अभाविपसह विधेयकाला विरोध करणाऱ्या संघटनानी दिला आहे. राज्यपालांनी कोणत्याही स्थितीत विद्यापीठ सुधारणा विधेयकावर सही करू नये, अशी मागणी लावून धरली जाणार आहे. त्यात इतर संघटनाही आक्रमक होण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मध्ये नव्याने कलम ९ (अ) समाविष्ट करून प्र-कुलपतीपदीपदी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री असतील.

उदय सामंत
Pune-Mumbai Express: आरक्षित गाड्यांसाठी सीझन पास नाहीच

हा एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे; तर दुसरा बदल हा कुलगुरूंची आतापर्यंत थेट कुलपती तथा राज्यपालांच्या माध्यमातून नियुक्ती केली जायची. त्यात बदल करून या नियुक्तीसाठी कुलगुरूंच्या नावांची शिफारस सरकार करणार आणि सरकार काही अधिसभा सदस्य तसेच व्यवस्थापन परिषद सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव देणार असे काही बदल यातकरण्यात आले आहेत. यावर भाजपने आक्षेप घेत विद्यापीठांची स्वायत्तता धोक्यात येऊन ती राजकीयआखाडे बनतील अशी भीती व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com