Unmasking Happiness | लोककल्याणाचा वसा घेतलेले जाज्वल्य व्यक्तिमत्व : रामशेठ ठाकूर

Unmasking Happiness | लोककल्याणाचा वसा घेतलेले जाज्वल्य व्यक्तिमत्व : रामशेठ ठाकूर

कोरोनासारख्या महामारीचे जगभर तांडव सुरू आहे. आपल्या देशातील परिस्थितीही अशीच विदारक होती. या वेळी मजुरांपासून अगदी मध्यमवर्गीयही मेटाकुटीला आले होते. मुंबईच्या शेजारची महापालिका असलेल्या पनवेलमध्येही या संकटाच्या झळा बसत होत्या. अशा वेळी शहरवासीयांसाठी मतदतीचा हात देऊन आदर्श निर्माण करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर.  या नावात असलेली ताकद विधायक कार्याची ऊर्जा आहे. त्यामुळे त्यांच्या लोकल्याणकारी आदर्शांतून समाजात अनेक गुणिजन तयार झाले. त्यांचा लोककल्याणाचा ध्यास कधीच मावळलेला दिसत नाही.

पनवेल तालुक्‍यात परप्रांतीयांची संख्या मोठी आहे. या परप्रांतीयांसह येथील भूमिपुत्रांच्या समस्या, स्थानिक प्रशासनावरील अतिरिक्त ताण वगैरे बाबी हा वेगळ्या लेखाचा विषय होईल, पण अशा संकटसमयी धावून येणाऱ्यांमध्ये एक नाव अग्रस्थानी आहे, लोकनेते रामशेठ ठाकूर! आजवर १५ दिवसांच्या चार टप्प्यांत साधारण दोन महिने ‘लॉकडाऊन’ सुरू होता. रिक्षा, टॅक्‍सी, टेम्पोपासून सर्व वाहने आणि त्यावर आधारित पोटार्थी वाहनचालक, केशकर्तनालये आणि तिथले असंख्य कारागीर, टेलर्स, त्यांच्याकडील कारागीर, प्रेसचे कर्मचारी, पत्रकार, छोटे-मोठे व्यावसायिक, शेतमजूर, बांधकाम व्यावसायिक आणि बांधकाम मजूर, गॅरेजमधील कामगार, आपल्या शेतात तयार झालेला माल बाजारात जाऊन विकताही येत नसलेला शेतकरी या आणि अशा अनेकांची उपासमार होण्याची वेळ आली असताना मदतीचे हात पुढे आले होते. अर्थात लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नाव त्यामध्ये आग्रही होते! ठाकूर यांना आपला-परका हा भेदच मान्य नाही. समोर अडचणीत सापडलेला प्रत्येकजण आपला, या न्यायानेच ते सर्वांच्या संपर्कात आहेत. ‘एक तीळ सात जणांनी वाटून खावा’ ही आपली संस्कृती, या खऱ्याखुऱ्या लोकनेत्याने यादरम्यान प्रत्यक्षात आचरणात आणली. आपल्याकडील कष्टाने मिळवलेला खजिना अशा परिस्थितीने गांजलेल्या गरीब-गरजूंना अक्षरशः रिकामा करून दिला. किती तरी जणांना आसरा दिला. दोन वेळेला जेवण दिले, तेही कुठल्याही प्रकारचा गवगवा न करता!

आपले विविध व्यवसाय, राजकीय आणि सामाजिक संस्था, शिक्षण, पत्रकारिता, वाहतूक, व्यापार, बांधकाम, हॉटेलिंग आणि इतर सर्वच छोट्या मोठ्या व्यवसायांशी संबंधित सर्वांची काळजी घेऊन, सगळे सुखरूप असल्याची माहिती विविध प्रकारे घेताना तर दिसलेच, पण यादरम्यान प्रत्यक्ष मदतीनेही या सर्वांचे अश्रू पुसण्याचे महत्कार्य केले. उरण, पनवेलमधील प्रशासकीय यंत्रणेलाही सहकार्य करण्याचे पाऊल उचलून, संकटसमयी आपण सामान्य माणसाच्या पाठीशी आहोत आणि भविष्यातही राहू, असे जणू अभिवचन दिले.

सतत लोकांना मदत करणे हा रामशेठ ठाकूर यांचा पिंड आहे, त्यामुळे ते खऱ्या अर्थाने सर्व समाजाचे आधारवड आहेत. त्याच आधारवडाच्या छत्रछायेखाली वाढलेल्या कर्तृत्ववान आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्याच पावलांवर पाऊल टाकत मदतीचा रथ सुरू ठेवला आहे. कारोना विषाणू संसर्ग उपचारासाठी आवश्‍यक असणारे पीपीई किट खरेदी करण्यासाठी प्रशांत ठाकूर यांनी आपल्या आमदार निधीमार्फत विशेष बाब म्हणून पनवेल महानगरपालिकेला ५० लाख रुपये दिले. कारोना विषाणू संसर्ग उपचारासाठी आवश्‍यक असणारी यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी विशेष बाब म्हणून कामोठे एमजीएम हॉस्पिटलला २० लाख रुपयांचा आमदार निधी उपलब्ध केला. एक एक दिवस पुढे सरकत गेला आणि कोरोनाचं संकट गडद होत गेलं. भारताला या महामारीपासून दूर ठेवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा पहिला लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला. हातावर पोट घेऊन जगणाऱ्या माणसाला दोनवेळचे जेवण मिळणे मुश्‍कील झाले. या अशा उद्‌भवलेल्या संकटकालीन परिस्थितीत रायगड जिल्ह्यात रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने मदतीचा ओघ सुरू करण्यात आला.

पनवेल, उरण, कर्जत, खालापूर अशा तालुक्‍यांमध्ये रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नधान्याचे वाटत करण्यात आले. २६ मार्च ते २२ मे २०२० पर्यंत तब्बल ६१ हजार ८८५ गरजूंना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. आपण या संकटाच्या काळात मदतकार्याचा ओघ सतत सुरू ठेवला पाहिजे, अशा सूचना त्यांच्याकडून भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आणि या मदत कार्यामध्ये आणखीन भर पडत गेली.
रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल, कामोठे, खारघर, कळंबोली या ठिकाणी मोदी भोजन कम्युनिटी किचनच्या माध्यमातून दररोज तीन ते चार हजार नागरिकांना चांगल्या प्रतीच्या जेवणाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. २२ एप्रिल २०२० पासून या उपक्रमाला सुरुवात केली. २६ मार्च ते २२ मे २०२० पर्यंत एक लाख १९ हजार ९८१ जणांच्या भुकेला अन्नाचा घास मिळाला आहे. संपूर्ण जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मदतीचे कार्य करत आहेत. अनेक रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे आणि तो भरून काढण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाने ही उणीव भरून काढण्याचा संकल्प केला. एक हजार बाटल्या रक्त संकलित करण्याचा मानस करून तो पूर्ण करण्याचा निश्‍चय करण्यात आला आहे. याचबरोबर महापालिकेच्या महापौर सहाय्यता निधीला भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांनी दोन महिन्यांचे मानधन देऊन अडचणीच्या काळात महापालिकेला सहकार्य केले. याचबरोबर आपल्या प्रभागातील नागरिकांची काळजी घेत भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांकडून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने औषधांचे वाटप करण्याबरोबरच प्रभागात निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला. ३३ हजार ६३ मास्कचे वाटपही करण्यात आले. भारत सरकारने अडकलेल्या मंजुरीसाठी श्रमिक रेल्वे गाडीची व्यवस्था केली; परंतु यामध्ये मजुरांना आपल्या गावी जायला अडचण निर्माण होत आहे, हे लक्षात आल्यानंतर पनवेल भाजपच्या वतीने सहकार्य करण्याची भूमिका घेतली आणि यातून अनेक मजुरांना दिलासा देण्याचे काम करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आजची घडी वाईट आहे, ही वेळ निघून जाईल, पण त्या वेळी विखुरलेले जनजीवन पूर्वपदावर आले पाहिजे, लोकांना शासनाकडूनही दिलासा मिळाला पाहिजे यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी शासनदरबारी सतत पाठपुरावा सुरू ठेवला आहे. शासनाकडून लोकांना मदत मिळेपर्यंत त्यांनी वाट पाहिली नाही. स्वतःची पदरमोड करत आणि एक पाऊल पुढे जात जीवनावश्‍यक वस्तू आणि आधार देण्याचे काम स्वतः केले.
माणुसकी हा नुसता शब्द नाही तर मायेचा ओलावा आहे. आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी या दोन लोकप्रतिनिधींनी एमजीएम रुग्णालयात स्वतः कोरोनाग्रस्त रुग्णांची भेट घेतली आणि घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, लवकर बरे व्हा, कोरोनाला हरवा, असा धीर देत या संकटावर मात करण्याची हिंमत दिली. या अनुषंगाने बघायला गेलं तर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आमदार प्रशांत ठाकूर आणि युवा नेते परेश ठाकूर यांनी स्वतः जातीने लक्ष दिले. यामध्ये भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचा सहभागही मोलाचा ठरला आहे. यापुढेही एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडून लोकांप्रती कार्य अविरतपणे सुरूच असणार आहे.

स्वत:च्या विचारांवर, कृतीवर, क्षमतांवर आणि निर्णयांवर असलेला विश्‍वास म्हणजे आत्मविश्‍वास. तो आत्मविश्‍वास जनतेला देण्याचे काम होत असताना कोरोना संकटाला दूर करण्यासाठी स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या, असा मौलिक विचार लोकनेते रामशेठ ठाकूर देत आहेत.

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Unmasking Happines great personality who work for public welfare Ramsheth Thakur mumbai live update

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com