विक्रमगड तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची उडाली धांदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रमगड तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची उडाली धांदल !

विक्रमगड तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची उडाली धांदल

sakal_logo
By
अमोल सांबरे

विक्रमगड : आज सायंकाळच्या 4 च्या सुमारास अचानक आलेल्या पावसाने विक्रमगड तालुक्यातील आलोंडे, आपटी, कावळे, माले, उपराळे, देहर्जे, मलवाडा, शेलपाडा, ओंदे, माण, गावितपाडा, उघाणी, खांड, कुरंझे तसेच तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांनी शेतात कापून ठेवलेले तसेच झोडणीसाठी खळ्यात गोळा करून ठेवलेल्या भात पिक वाचवण्यासाठी एकच धांदल उडवली होती.

हेही वाचा: ST Strike : सरकारची विरोधकांशी चर्चा; तोडग्याची शक्यता!

अधिच निसर्गाच्या लहरीपणामुळे तालुक्यातील भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यातून थोडेफार वाचलेले भातपिक शेतकऱ्यांनी खळ्यावर आणून ठेवले आहे. मात्र मजुरांच्या कमतरतेळे हे भातपिक झोडणी करण्याचे राहिले आहे. त्यामुळे आज सायंकाळी 4 च्या सुमरास विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने सुरुवात केली. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची हे भातपिक वाचविण्यासाठी त्यावर प्लास्टिक, ताडपत्री टाकण्यासाठी धांदल उडवली होती.

हेही वाचा: बंदच्या हिंसक वळणाची जबाबादारी घेता का? रझा अकादमीने दिलं उत्तर

आज सायंकाळी 4 ते संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडवली होती. भात, नाचणी, तुर, उडीद व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तुर पिकाचे प्रचंड नुकसान झाले असुन. भात पिकांची कापणी, मळणीची कामे सुरु आहेत. आधीच संकटात असलेला शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित आहे आणि त्यातच खाण्यापूर्ती राहिलेले भात देखील या पावसात जाते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला असुन आत्ता जगावे कसे अशी चिंता त्याला सताऊ लागली आहे.

loading image
go to top