esakal | चार महिन्यात भाजपचे अनेक आमदार महाविकास आघाडीकडे येणार,अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
sakal

बोलून बातमी शोधा

चार महिन्यात भाजपचे अनेक आमदार महाविकास आघाडीकडे येणार,अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

पुढच्या चार महिन्यात अनेक आमदार महाविकास आघाडीकडे येतील, असा गौप्यस्फोट उपममुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. 

चार महिन्यात भाजपचे अनेक आमदार महाविकास आघाडीकडे येणार,अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः  भारतीय जनता पक्षाला आता झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सुशिक्षित, पदवीधर मतदारसंघानं नाकारलं. तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन झाल्यानं तुमचा हातातोंडाशी आलेला घास गेला. सहा महिन्यात सरकार पडणार असं वारंवार म्हटलं जातं होतं. आता महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं. आता बघा. पुढच्या चार महिन्यात अनेक आमदार महाविकास आघाडीकडे येतील, असा गौप्यस्फोट उपममुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. 

काल विधानसभेच्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या अनुषंगानं चर्चा झाला. या चर्चेदरम्यान अजित पवारांनी हा गौप्यस्फोट केला आहे. याच दरम्यान अजित पवार पुढे म्हणाले की, धुळे- नंदुरबारमध्ये अमरिश पटेल निवडून आले असले, तरी ते आमच्याकडूनच तिकडे गेलेले आहेत. पटेल यांच्या विचारांशी नाळ आमच्याशीच आहे. त्यामुळे ते परत केव्हा येतील, हे तुम्हाला कळणारही नाही. पुण्यात चंद्रकांत पाटील यांचाच पराभव झाला आहे. त्यामुळे ही भाजपनं धोक्याची घंटा समजावी. 

हेही वाचा- कांजूरमार्ग मेट्रो कारशेडला खीळ; कामकाज तात्काळ थांबवा, हायकोर्टचा आदेश


अजित पवारांनी स्वीकारलं सुधीर मुनगंटीवारांचं चॅलेंज

हिवाळी अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी काही मुद्द्यांवरुन सरकार आणि विरोधी पक्षात चांगलची जुंपली. त्याचवेळी सभागृहात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली होती.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी  पुरवणी मागण्या सादर केल्या. त्यावर विधानसभेत चर्चा सुरु होती. त्यावेळी सुधीर मुनगंटीवार बोलायला उभे राहिले होते.  त्यांनी चौफेर टोलेबाजी करत राष्ट्रवादी आणि सेनेच्या नेत्यांना चिमटे काढण्यास सुरुवात केली.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

भाषण वाढत असल्यामुळे मुनगंटीवार यांना मुद्यावर बोलण्याचे सांगितले. तसंच त्याचदरम्यान मुनगंटीवार बोलत असताना  कुणीतरी एक सदस्य मध्येच बोलण्यासाठी उभा राहिला. त्यानंतर आता आम्ही समर्थ आहोत. सभागृह हे माझे कुटुंब आहे. माझ्या भाषणात कुणी अडथळा आणत असेल किंवा अडकाठी आणत असेल तो पुन्हा निवडून येत नाही, असं मुनगंटीवार म्हणाले. त्यावर अजित पवार यांनी मुनगंटीवार यांना मी तुमचं आव्हान मी स्वीकारतो मला पाडून दाखवा, असं थेट आव्हान दिलं.

अजित पवार हे त्यांच्या समोरचं बसले होते. खुमासदार टोला लगावत तुमचे आव्हान मी स्वीकारले आहे, मला पाडूनच दाखवा असं अजितदादा म्हणाले. उपमुख्यमंत्र्यांच्या टोल्यानंतर सभागृहात एकच हश्शा पिकली. 

अजित पवार म्हणाले की, मुळात पडण्याचे दोन प्रकार आहे. एक लोकशाहीमध्ये आणि दुसरा 23 नोव्हेंबरचा आहे. हे आम्ही करून दाखवले आहे, असं काय करता दादा, आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे.

upcoming four months bjp mla will join mahavikas aghadi said ajit pawar