esakal | मोबाईल पसरवतोय कोरोना ? रुग्णालयात मोबाईलच्या वापरासंदर्भात डॉक्टरांनी केली 'ही' मोठी मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईल पसरवतोय कोरोना ? रुग्णालयात मोबाईलच्या वापरासंदर्भात डॉक्टरांनी केली 'ही' मोठी मागणी

एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे किंवा आपले हात तोंडाला लावल्यामुळे कोरोना होतो हे आपल्याला माहितीच आहे. मात्र आता डॉक्टरांनी रुग्णालयात मोबाईलच्या वापरासंदर्भात एक महत्वाची मागणी केली आहे.

मोबाईल पसरवतोय कोरोना ? रुग्णालयात मोबाईलच्या वापरासंदर्भात डॉक्टरांनी केली 'ही' मोठी मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोरोनानं संपूर्ण जगात अक्षरशः थैमान घातलं आहे. भारतातही दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आपल्या प्राणांची पर्वा न करता रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी झटत आहेत. एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे किंवा आपले हात तोंडाला लावल्यामुळे कोरोना होतो हे आपल्याला माहितीच आहे. मात्र आता डॉक्टरांनी रुग्णालयात मोबाईलच्या वापरासंदर्भात एक महत्वाची मागणी केली आहे.

कोरोनाचा संसर्ग होण्याची अनेक कारणं आहेत त्यातील एक महत्वाचं कारण म्हणजे आपण बाहेरून आल्यावर किंवा बाहेर गेल्यावर स्वच्छता न पाळता आपले हात आपल्या तोंडाला आणि डोळ्यांना लावतो. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका बळावतो. तसंच जर तुम्ही मोबाईल स्वच्छ ठेवत नसाल तर हात वारंवार धुण्याचा काहीही उपयोग नाही असं डॉक्टरांनी म्हंटलंय. मात्र आता मोबाईलचा वापर रुग्णलयांमध्ये पूर्णतः बंद व्हायला हवं असं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजेच एम्सनं म्हंटलंय. 

हेही वाचा: "साहब मै मजदूर हुं और मजबूर हुं", डोळ्यात पाणी आणणारा एक माफीनामा.. 

मोबाईलमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे, कारण मोबाईल थेट चेहरा किंवा तोंडाच्या संपर्कात येतो. तुम्ही हात स्वस्छ धुतले तरी फोन आल्यावर मोबाईल कानाला लावावा लागतो. त्यावर कोरोनाचे जंतू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हॉस्पिटल असो की कार्यालय आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनचा वापर चांगल्या कामासाठी होत असला तरी त्यातून कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती नाकारता येत नाही असं बीएमजे ग्लोबल हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात एम्सनं म्हंटलंय. 

आरोग्य कर्मचारीच करतात फोनचा वापर: 

रुग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्तांना सेवा पुरवणारे आरोग्य कर्मचारीच रुग्णलयांध्ये मोबाईलचा वापर करतात. आपल्या कामाच्या वेळात १५ मिनिटं ते २ तासांपर्यंत हे कर्मचारी मोबाईलचा वापर करतात. आधी कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात येऊन त्यानंतर मोबाईलचा वापर केल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असते. त्यामुळेच रुणालयांमध्ये मोबाईलचा  वापर पूर्णपणे बंद व्हावा असं एम्सनं म्हंटलं आहे. 

मोठी बातमी: BMC ताब्यात घेणार मुंबईतील वानखेडे स्टेडियम: वानखेडेत 'या' कोरोना रुग्णांवर होणार उपचार.. 

केवळ 'इतके' टक्के लोकं करतात मोबाईल स्वच्छ: 

एका अभ्यासानुसार, मोठ्या हॉस्पिटलमधले १०० टक्के आरोग्य कर्मचारी स्मार्टफोनचा वापर करतात. मात्र यातले केवळ १० टक्के कर्मचारी फोन स्वच्छ ठेवतात ही गोष्ट एका अभ्यासातून समोर आली आहे. तसंच ज्या सात गोष्टींमुळे कोरोनाचा संसर्ग होतो. त्या सात गोष्टींमध्ये मोबाईलचा ही समावेश आहे. त्यामुळेच डॉक्टरांनी मोबाईल वारंवार स्वच्छ करण्याचा सल्ला दिला आहे. मोठ्या रुग्णालयांमध्ये मोबाईलच्या वापरावर बंदी घालण्यात यावी असं एम्सनं म्हंटलंय.  

use of mobile phones should be banned in hospitals said AIMS read full story

loading image
go to top