आता वांद्रे कुर्ला संकुलात जाण्यासाठी वापरा अनोख्या आणि भन्नाट ई-बाइक, आधी किंमत जाणून घ्या

सुमित बागुल
Tuesday, 1 September 2020

अशा प्रकारचा एक प्रयोग या आधीच नवी मुंबईत राबवला गेला होता. नवी मुंबईत या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळालं होता.

मुंबई : मुंबईतील वांद्रे ते कुर्ला या भागात तुम्हाला प्रवास करायचा असेल तर तुमच्यासाठी आता एका अनोख्या आणि नव्या तंत्रज्ञानाच्या बाईक्स उपलब्ध असणार आहेत. या बाईक्ससाठी ना तुम्हाला लायसन्स लागेल ना PUC. अवघ्या काही रुपयात तुम्हाला या बाईक्स वापरता येणार आहेत. 

आम्ही ज्या बाईक्सबद्दल बोलतोय त्या युलू ई-बाइक वरून तुम्ही आता वांद्रे ते कुर्ला हा प्रवास करू शकतात. कालपासून मुंबईतील वांद्रे पूर्वे ते कुर्ला पश्चिमेपर्यंत आता युलू ई-बाइक सुविधा सुरु झाली आहे. MMRDA आणि युलू ई-बाइक यांच्या माध्यमातून ही सुविधा सुरु झाली आहे. MMRDA चे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांच्या प्रमुख उपस्थितीत या सेवेचं उद्घाटन झाले.

महत्त्वाची बातमी एका आमदाराची गौरव आर्यासोबत कोट्यवधींची गुंतवणूक, ED ने बजावला समन्स

अशा प्रकारचा एक प्रयोग या आधीच नवी मुंबईत राबवला गेला होता. नवी मुंबईत या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळालं होता. त्यानंतर आता मुंबईतील वांद्रे ते कुर्ला यादरम्यान युलू बाइक सुविधा सुरू करण्यात आलेली आहे.

ही बाईक तुम्हाला वापरायची असल्यास त्यासाठी आधी ऍप्लिकेशनवरून या सेवेला स्बस्ट्राईब करावं लागेल. यामध्ये १९९ रुपये सेफ्टी डिपॉझिट रक्कम असणार आहे. ऑनलाईन माध्यमांचा वापर करून तुम्हाला सायकलच्या  ऍप्लिकेशन वॉलेटमध्ये पैसे भरावे लागतील. ही बाईक स्थानकावरून घेण्यास ५ रुपये आणि प्रति मिनिटांसाठी दीड रुपये आकारले जातात. ही बाईक वापरायची असेल तर याबाबतच्या काही खास ऑफर्स देखील ग्राहकांना वापरता येणार आहेत. तुम्ही ही बाईक २४ तासांसाठी देखील घेऊ शकतात.     

महत्त्वाची बातमी शरद पवारांचा सल्ला स्वीकारला आणि सोनिया गांधीची नाराजी पत्करुन प्रणवदा मातोश्रीवर गेले

दररोज वांद्रे आणि कुर्ला स्थानकात लाखो प्रवासी येत असतात. यापैकी अधिकतर प्रवासी वांद्रे कुर्ला संकुलात येतात. अशा प्रवाशांना या विशेष बाईक्सचा वापर करता येणार आहे. सध्या विविध नऊ ठिकाणांवर १०० ई-बाईक्स ठेवण्यात आलेल्या आहेत. येत्या काळात ही संख्या ५०० वर नेण्याचा उद्देश आहे.  

use yulu e bikes for travelling from bandra kurla complex from bandra and kurla

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: use yulu e bikes for travelling from bandra kurla complex from bandra and kurla