

Mumbai Electricity Supply
ESakal
मुंबई : बोरिवली येथे स्थानिक भाजप आमदार संजय उपाध्याय आणि वीज पुरवठादारांमध्ये एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत बीएमसी, टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटीचे वरिष्ठ अधिकारी प्रमुख सहभागी होते.ही अशा प्रकारची पहिलीच आणि एक ऐतिहासिक बैठक होती, ज्यामध्ये जनतेच्या मूलभूत समस्यांचे निराकरण आणि भविष्यातील योजना यांवर सखोल चर्चा करण्यात आली.