esakal | यूपीएससी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या पूर्वपरीक्षेची तारीख...
sakal

बोलून बातमी शोधा

upsc.j

कोरोना संसर्गामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) पूर्व आणि मुख्य परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. शुक्रवारी आयोगाने पूर्व आणि मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

यूपीएससी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या पूर्वपरीक्षेची तारीख...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोना संसर्गामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) पूर्व आणि मुख्य परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. शुक्रवारी आयोगाने पूर्व आणि मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

वाचा ः योग्यवेळी उपचार मिळाल्याने गर्भवती महिलेचा वाचला जीव! सुप्रिया सुळेंच्या मध्यस्तीने यंत्रणा तत्काळ हलली

आयोगाने पुढे ढकलल्या परीक्षांसाठी नवीन वेळापत्रक यूपीएससीच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे. सिव्हिल सर्व्हिसेस पूर्व परीक्षा जी आधी 31 मे रोजी नियोजित होती. ती लॉकडाऊनमुळे स्थगित करण्यात आली होती. नव्या वेळापत्रकानुसार सिव्हिल सर्व्हिसेस पूर्व परीक्षा 4 ऑक्टोबर 2020 रोजी तर मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. शिवाय 2019 च्या परीक्षेमध्ये मुलाखतीचा टप्पा कोरोनामुळे अपूर्ण राहिला होता. ज्या उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण होऊ शकल्या नव्हत्या, त्या 20 जुलै 2020 पासून सुरु होणार आहेत. 

वाचा ः मुंबईत 3000 खाटांची व्यवस्था केली; मात्र अद्यापही त्या आहेत रिकाम्या.. कारण वाचाल तर धक्का बसेल...

त्याबाबत उमेदवारांना वैयक्तिक पत्राद्वारे तारीख कळवली जाईल. एनडीएची परीक्षा 6 सप्टेंबर 2020 रोजी होणार आहे. केंद्रीय सुरक्षा पोलीस दलाच्या परीक्षेसाठी 18 ऑगस्ट 2020 पासून नोंदणी सुरू होणार असून 20 डिसेंबर 2020 रोजी परीक्षा होईल. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसची परीक्षा 28 फेब्रुवारी 2021 रोजी होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

वाचा ः निर्बंधातून बाहेर पडत नेस्लेच्या मॅगीला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद; गेल्या वर्षांत झाली 'इतकी' विक्री...

यूपीएससीच्या वर्षभराच्या परीक्षांचे वेळापत्रक आधीच जाहीर होत असते. यावेळी कोरोनाच्या संकटामुळे परीक्षेचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. पण आज आयोगाने नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. अर्थात परिस्थिती अगदीच हाताबाहेर गेल्यास या परीक्षांच्या तारखेत थोडाफार बदल होऊ शकतो असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

loading image
go to top