वरळी, भायखळा, दादर डेंगीचे हॉटस्पॉट

उपचारास विलंब न करण्याचा सल्ला
mumbai
mumbaisakal

मुंबई : कोरोना काळात हॉटस्पॉट ठरलेला वरळी, धारावी, भायखळा आणि दादर हा परिसर आता डेंगीचा हॉटस्पॉट झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सापडलेल्या मुंबईतील डेंगीच्या एकूण रुग्णांपैकी बहुतेक रुग्ण या भागातील आहेत. त्यावर उपाय म्हणून डेंगी आणि मलेरियाच्या डासांना नष्ट करण्यासाठी वरळीमध्ये ड्रोनचा वापर केला जात आहे.

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट संपत आली असताना डेंगीचा प्रादुर्भाव वाढत आहे. दरवर्षी सप्टेंबरपासून डेंगीच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसते, परंतु यावेळी ऑगस्टपासून डेंगीने डोके वर काढले आहे. ऑगस्ट महिन्यात मुंबईत डेंगीचे १४४ रुग्ण आढळले होते. त्यापैकी बहुतांश रुग्ण वांद्रे, सँडहर्स्ट रोड आणि परळ भागातील होते;

मात्र सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत डेंगीचे ३०५ रुग्ण आढळले असून त्यापैकी सर्वाधिक प्रादुर्भाव वरळी, भायखळा, दादर सारख्या निवासी भागात वाढला आहे. त्यामुळे या भागात पालिकेकडून विशेष उपाययोजना राबवल्या जात आहेत. अडगळीच्या जागेतील डेंगी आणि मलेरियाच्या अळ्या नष्ट करण्यासाठी पालिकेकडून ड्रोनचा वापर केला जात आहे, अशी माहिती जी- दक्षिण विभागाचे कीटकनाशक अधिकारी प्रशांक कांबळे यांनी दिली.

mumbai
शाळा सुरू होण्यापूर्वी मुंबईतील शिक्षक पुन्हा निवडणूक ड्युटीवर

मुंबईच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये शीव, नायर, केईएम आणि कूपर रुग्णालयातील ओपीडीमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज २०० ते २५० रुग्ण उपचारासाठी येतात, त्यापैकी १० ते १२ रुग्ण मलेरिया आणि डेंगीचे आहेत.

- डॉ. रमेश भारमल, पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे संचालक

गेल्या वर्षी डेंगी आणि लेप्टोच्या आजारांमध्ये घट झाली होती. या वर्षी मात्र त्यात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून डेंगीचे रुग्ण आणखी वाढतील. त्यामुळे ताप, अंगदुखी, सांधेदुखी किंवा पुरळ यांसारख्या सामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

- डॉ. हर्षद लिमये, संसर्गजन्य रोगतज्ज्ञ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com