सर्वात मोठी बातमी! यल्गार परिषद प्रकरणाचे मुख्य आरोपी वरवरा राव यांना कोरोनाची लागण..

मिलिंद तांबे 
गुरुवार, 16 जुलै 2020

यल्गार परिषद  प्रकरणात अटकेत असलेले कवी वरवरा राव यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

मुंबई; यल्गार परिषद  प्रकरणात अटकेत असलेले कवी वरवरा राव यांना कोरोनाची बाधा झाली आहे. जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजित मानकेश्वर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. काही दिवसापुर्वी रुग्णालय प्रशासनाने वरवरा राव यांची कोरोना चाचणी केली होती. 

सामाजिक कार्यकर्ते आणि कवि असलेले वरवरा राव हे 80 वर्षाचे असून, यल्गार परिषद प्रकरणात ते मुख्य आरोपी  आहेत. सध्या वरवरा राव यांना तळोजा तुरुगांत ठेवण्यात आले आहे. काही दिवसापासून प्रकृती खालावल्यामुळे त्यांना जे जे रुग्णालयात हलवण्यात आले होते. 

हेही वाचा: निकाल तर लागला मात्र आता प्रवेशाचे टेन्शन; सीईटीच्या परीक्षेसाठी उजाडणार सप्टेंबर..

वरवरा राव यांची प्रकृती स्थीर असून त्यांना श्वास घेण्यात कुठलाही त्रास होत नाही. अशी माहिती डॉ. रणजित मानकेश्वर यांनी दिली आहे. त्यांना लवकरच कोविड रुग्णालयात हलवण्यात येणार आहे. राव यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात हलवण्याची शक्यता असल्याची माहितीही त्यांनी दीली आहे.

गेल्या आठवड्यात राव यांच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची प्रकृती ढासळत असल्याचा आऱोप केला होता. राव यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्याची मागणी या पत्रकारपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आली होती.यापुर्वी मे महिन्यात तळोजा तुरुंगात वरवरा चक्कर येऊन कोसळल्याने  त्यांना जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होते.

हेही वाचा: अरे बापरे!  लॉकडाऊन काळात तणावासोबत वाढतोय संताप; 'हे' आहे मुख्य कारण..वाचा महत्वाची बातमी..

जेजे मधून सेंट जॉर्ज मध्ये हलवणार:

वरवरा राव यांनी जेजे रुग्णालयातून सेंट जॉर्ज किंवा जीटी रुग्णालयात हलवण्यात येणार आहे. जेजे हे नॉन कोव्हीड रुग्णालय असल्याने तेथे वरवरा राव यांनी इतर रुग्णालयात हलवणे सोयीस्कर असल्याचे रुग्णालय प्रशासनाला वाटते. सेंट जॉर्ज आणि जीटी रुग्णालये ही कोव्हीड रुग्णालये आहेत.त्यामुळे त्यांना सेंट जॉर्ज किंवा जीटी रुग्णालयात हलवण्यात येणार असल्याची माहिती जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता रणजित माणकेश्वर यांनी दिली.

संपादन : अथर्व महांकाळ 

varvara rao has corona positive 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: varvara rao has corona positive