
विरार : गणेशोत्सवात रात्री जागरण करून गणपती जागवला जातो अशी प्रथा आजही ग्रामीण भागात पाळली जात आहे. रात्र जागवण्यासाठी कधी भजन,कधी कीर्तन होत असतानाच वसई तालुक्यातील शिरवली गावात सारीपाटाचा डाव मांडला जात असून पालघर जिल्हात याच गावात हा खेळ खेळला जात असल्याने वसईत हा कुतुहालाचा विषय ठरला आहे. खेळाची ही परंपरा जपण्यासाठी कुटुंबातील व्यक्तीं बरोबरच गावातील लोक सारीपाटाचा डाव मांडून ही परंपरा जपत आहेत.