esakal | वसई : अर्नाळ्यात बोटीतून नालेसफाई
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

वसई : अर्नाळ्यात बोटीतून नालेसफाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वसई : वसई (Vasai) तालुक्याच्या टोकाला वसलेले अर्नाळा (Arnala) गाव समुद्रकिनारी आहे. या ठिकाणी येणाऱ्या सांडपाण्याने वाहणाऱ्या नाल्यात कचरा मोठ्या प्रमाणात साचल्याने निचरा होण्यास अडचण येत असल्याचे समजताच 'मी जागृत वंदरपाडेकर' संस्थेच्या तरुणांनी नालेसफाई करण्यासाठी चक्क बोटीचा आधार घेतला आहे.

नाल्यात वसई-विरार शहर पालिकेच्या हद्दीतील सांडपाणी येते; मात्र प्लास्टिक, बाटल्या यासह विविध प्रकारचा कचरादेखील वाहून येतो व अडकतो. त्यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव वाढत असून न रोगराई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच कारणास्तव मी जागृत बंदरपाडेकर संस्थेतील महाराष्ट्र पोलिस दलात असलेले पराग म्हात्रे, निनाद पाटील, गौतम नाईक, अभियंता असलेला भावेश म्हात्रे, हितेश तांडेल व अक्षय म्हात्रे यांनी सक्रिय सहभाग घेत स्वच्छता मोहीम हाती घेतली.

हेही वाचा: दादर-माहीम नाला गाळ-कचऱ्याने तुडुंब

बोट व गाळ काढण्यासाठी साहित्य हातात घेत हे ब्ल तरुण नाल्यात उतरले, सांडपाण्याचा निचरा न झाल्याने गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. तसेच हे पाणी समुद्राला मिळून जलप्रदूषण होईल. त्यामुळे सर्वांनी एकत्र येत नाल्याची सफाई केली. सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. निनाद पाटील, मी जागृत बंदरपाडेकर संस्था

loading image
go to top