
Vasai Fort Incident Guard Refuses to Speak Marathi to Man in Shivaji Attire Video Triggers Debate
Esakal
मुंबईत मराठी विरुद्ध हिंदी भाषिक वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे. अमराठी लोक मराठी शिकत नसल्याचा आणि मराठीला विरोध करत असल्याचा आरोप सातत्यानं होतो. याआधीही अमराठी लोकांच्या मुजोरीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. वसई किल्ल्यावरचा हा व्हिडीओ असून यात छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पोशाख घातलेल्या तरुणाला तिथल्या सुरक्षा रक्षकानं अडवल्याचं दिसतंय. त्यानंतर संबंधित सुरक्षा रक्षक हिंदीत बोलत असल्यानं तरुणाने त्याला खडसावलं.