esakal | वसई तालुक्यातील ससुनवघर येथील 150 वर्षांपूर्वीची गौरी गणपतीची आरास
sakal

बोलून बातमी शोधा

Vasai Ganpati Festival

वसई तालुक्यातील ससुनवघर येथील 150 वर्षांपूर्वीची गौरी गणपतीची आरास

sakal_logo
By
संदीप पंडित

विरार : लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवातून (Ganpati festival) जनजागृती करण्याचा हेतू होता. त्याकाळानंतर अनेकांनी आपल्या घरी गणपती आणि गौरीची प्रतिष्ठापना करण्यास सुरुवात केली. त्याच काळात वसई (vasai) तालुक्यातील ससुनवघर येथेही गणपतीची सुरुवात झाली. या गावातील विजय गोविंद पाटील यांचे आजोबा नारायण झाहूर पाटील यांच्याकडेही गौरी गणपती येण्यास सुरुवात झाली होती. या गौरी गणपतीसाठी त्यावेळी आरास तयार करून घेण्यात आली होती. ती आरास आजही 150 वर्षानंतर साऱ्याचे लक्ष वेधून घेत आहे. ज्या ठिकाणी गौरी गणपती स्थापित करण्यात येतो त्या घराला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi), मोरारजी देसाई (Morarji desai) , यांनी भेट दिली असून यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी वेणू ताई चव्हाण या तर या घरात 1962/63 च्या दरम्यान काही दिवस राहून गेल्या आहेत. अशी आठवण विजय पाटील यांनी सकाळशी बोलताना सांगितली.

हेही वाचा: BMC : मुंबईतील 80 टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण

श्री गणेश आणि श्री गौरी माता पूजन ससूनवघर येथे विजय गोविंद पाटील आणि परिवाराकडून करण्यात येत असून यावेळी सुमारे 150 वर्षे पूर्वी पासूनचे मखर सजावट वापरण्यात्त येत आहे.ही सजावट तयार करण्यासाठी चुना,गुळ , नदीतील रेती , बारीक दगड आणि मातीने तयार केलेली आहे. तीन फूट उंचीची आणि जवळपास अडीच फूट रुंदीची हि सजावट असून यावर वेली पाने कोरली असून त्यावर पोपट बसलेले दाखविण्यात आले आहेत याला दोन खांब असून एखाद्या राजवाड्याचा लूक देण्यात आला आहे.

यावरील रंग आजही ताजे वाटत असूनही आरास साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. पारंपरिक समाजावट आणि संस्कृतीचे संमेलन ह्या उत्सवात दिसून येत आहे.याठिकाणी येणाऱ्या गौरीचे दागिनेही 150 वर्षा पूर्वीचे आहेत तर काही दागिने हे आताचे आहेत यात 5 तोळ्याचा सोन्याचा हार, 2 बोरमाळ,छोटा हार ,सोन्याच्या बांगड्या, नथ,कानातील कुंडले, आणि सोन्याचा मुकुट असा ऐवज आजही पाटील परिवाराने जपून ठेवला आहे. पाटील परिवार सुरुवातीला दर्पाले येथून गणपती आणि गौरीची मूर्ती होडीतून घेऊन येत असत नंतर मात्र त्यांची मूर्तीही वसईतील कडू ब्रदर यांच्याकडून आणण्यास सुरुवात केली आहे.

अश्या ह्या ऐतिहासिक वारसा असलेल्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविक याठिकाणी येत आहे. तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी 1977 साली बडोदा येथे जात असताना थोडावेळ विजय पाटील यांच्या या घरात थांबल्या होत्या त्यावेळी तारामाई वर्तक,र.मा. चौधरी,जॉन अल्मेडा यांच्या उपस्थितीत विजय पाटील यांच्या मातोश्री शांताबाई गोविंद पाटील व ससुनवघरचे सरपंच एकनाथ म्हात्रे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता. अशी आठवण हि विजय पाटील यांनी यावेळी सांगितली.

loading image
go to top