वसई- विरारमधल्या नोकरदारांचे हाल, सलग दुसऱ्या दिवशी बस प्रवाशांना फटका

वसई- विरारमधल्या नोकरदारांचे हाल, सलग दुसऱ्या दिवशी बस प्रवाशांना फटका

मुंबईः मुंबईत सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. पहाटेपासून मुंबई-ठाणे-नवी मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसााचं थैमान सुरू आहे.  त्यात दोन दिवसांपूर्वी मुंबई महामार्गावर कांदीवली येथे दरड कोसळली होती. त्यानंतर वसई विरारमधून मुंबईकडे जाणारी बस सेवा बंद पडली आहे. सलग दुसऱ्या दिवशीही पावसामुळे ही बस सेवा बंद आहे. त्यामुळे याचा फटका हजारो चाकरामान्यांना बसला आहे. दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आणि त्यामुळे रस्ते बंद झालेत. याचा परिणाम सर्व एसटी बस सेवेवर झाला आहेत. आजही एसटी बस बंद ठेवण्यात आल्यात. 

मंगळपासून सुरु असलेला मुसळधार पाऊस आज सकाळपर्यंत तसाच कायम आहे. याचा परिणाम एसटी सेवेवर झाला. कोरोनाच्या संकटकाळात मुंबईला कामावर जाण्यासाठी सध्या एसटी बस सेवा हा एकमेव पर्याय चाकरमान्यांसमोर आहे. सलग दोन दिवस मुसळधाप पावसामुळे ही सेवा बंद असल्यानं खासगी सेवेतील कर्मचाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

सलग दोन वसई विरारमध्येही पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसाने वसई विरार नालासोपाऱ्यातील रहिवाशांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.  नालासोपारा पूर्व तुळींज पोलिस ठाणे ते ओसवाल नगरीपर्यंतचा पूर्ण रस्ता पाण्याखाली गेला. आचोले रोड, अलकापुरी रोड, नागीनदास पाडा महापालिका रुग्णालयासमोर सर्व रस्ते जलमय झाले असून गुडगाभर पाणी रस्त्यावर साचले होते. 

विरार पश्चिम विवा कॉलेज रोड, परिसर राम नगर, एम बी इस्टेट या परिसरात पाणी साचलं आहे. रामनगर परिसरातील 10 ते 15 सोसायटी पाण्याखाली गेल्या आहेत. तळ मजल्यावरील घरात फूट दोन फूट पाणी साचले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे.

विरार आणि नालासोपारा बस आगारात गुडघाभर पाणी जमा होते. सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना बसच्या गोंधळाचा फटका बसला, कारण बस बंद असल्याच्या कोणत्याही सूचना देण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे प्रवासी सकाळी भर पावसात आगारात उभे होते. पण बस बंद असल्याने त्यांना माघारी परतावं लागलं. 

सध्या पावसाचा जोर कायम आहे. मुंबईतील अनेक मार्ग पाण्याखाली गेले असल्याने वाहतूक बंद आहे. म्हणून आम्ही बस न काढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती नालासोपारा आगराच्या प्रमुख प्रज्ञा सानप यांनी दिली. काल रस्त्यात अडकून पडल्याने प्रवासी आणि चालकांना त्रास सहन करावा लागला. रस्ता वाहतूक सुरळीत होईपर्यंत बस बंद राहतील असंही त्यांनी सांगितलं.

Vasai Virar employees face st bus service shut problem

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com