vasai virar municipal corporation
sakal
संदीप पंडित
विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना नियमानुसार विविध सोयीसुविधा पुरविल्या जाणार आहेत. महापौर यांना वाहन प्रतिपूर्ती भत्ता म्हणून दर महिन्याला ७५ हजार रुपये दिल्या जातील. तसेच उपमहापौर यांना ६५ हजार, स्थायी समिती सभापती ५५ हजार, विरोधी पक्षनेता आणि सभागृह नेत्याला ५० हजार, तर इतर सर्व सभापतींना वाहन प्रतिपूर्ती भत्ता म्हणून प्रत्येक महिन्याला ४५ हजार रुपये दिले जाणार आहेत. एका बाजूला महापौरांना पालिकेचे वाहन नसतानाच दुसऱ्या बाजूला गेल्या १५ वर्षात महापौरांना पालिकेचे निवासस्थानही तयार करण्यात आलेले नाही.