

VVMC Opposition Leader
ESakal
संदीप पंडित
विरार : वसई-विरार महापालिकेच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत विरोधी पाशाला २५ जागा मिळाल्याने त्यावेळी पालिकेत विनायक निकम हे विरोधीपक्ष नेता म्हणून स्थानापन्न झाले होते. परंतु दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत विरोधी पाशाला अवघ्या ६ जागा मिळाल्याने त्यावेळी विरोधीपक्ष नेता निवडण्यात आला नव्हता, त्यामुळे आता थेट २०१५ नंतर म्हणजेच १० वर्षानंतर महापालिकेत विरोधी पक्षनेता असणार आहे.