
वसई : पावसाळ्यात साथीचे आजार निर्माण होऊ नये, म्हणून दक्षता घेण्यासाठी आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. असे असले तरी शहरात विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग होत आहेत. यामुळे डासांची पैदास, माशांचा प्रादुर्भाव वाढण्याची आणि आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. यासाठी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.