
वसई : परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी एकांताच्या जागेसाठी असो, की वृत्तपत्रे, कादंबरी, पुस्तकांच्या वाचनासाठी असो, ग्रंथालयाची जागा सर्वांसाठी सोईस्कर असते; मात्र लॉकडाऊनपासून आजतागायत टाळे असल्याने वाचनाचे खाद्य केव्हा मिळेल, यासाठी वसईतील वाचक प्रतीक्षेतच आहेत. सरकारने हळूहळू अनलॉक प्रक्रिया सुरू केली असतानाच आता ग्रंथालये खुली करावीत, अशी मागणी सुजाण नागरिकांतून होत आहे.
पालघर साधु हत्या प्रकरण : अठरा पोलिसांवर सरकारकडून कारवाई
विरार, नालासोपारा तसेच के. ब. हेडगेवार ग्रंथालय अभ्यासिका- नवघर, डॉ. धोंडो गोविंद अभ्यंकर अशी चार ग्रंथालये शहरात आहेत. या ठिकाणी एकूण 84 हजार विविध लेखक, कवी, साहित्यिकांची पुस्तके असून, चारही ठिकाणी मिळून मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, तमिळ, इंग्रजी अशी सहा भाषेंतील 164 वर्तमानपत्रेदेखील असतात. वाचनाचा छंद असणाऱ्या वाचकांची येथे मांदियाळी असायची; परंतु लॉकडाऊनपासून ग्रंथालये बंद आहेत. त्यामुळे हजारो सभासद पुस्तकांसाठी व्याकुळ झाले आहेत.
वसई विरार महापालिकेच्या प्रभाग समिती "एच'मध्ये डॉ. हेडगेवार सार्वजनिक वाचनालय- ग्रंथालय आहे. याची स्थापना 1989 मध्ये नगर परिषद असताना झाली. याला अ वर्गाचा दर्जा प्राप्त आहे. पोलिस, डॉक्टरांपासून ते अगदी वकिलीपर्यंत परीक्षा अभ्यासक्रमाची पुस्तके या ठिकाणी उपलब्ध आहेत. अभ्यासिकेसाठी स्वतंत्र इमारत असून पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर एकूण 400 जणांना आसनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे; परंतु सध्या कोणीच फिरकू शकत नाही. नवनवीन लेखकांची पुस्तके चाळण्याचा आनंद वाचकांना घेता येत नाही. सरकारने लॉकडाऊन जरी हळूहळू शिथिल केले असले, तरी पुस्तकांची बंद दारे कधी उघडली जाणार, याकडे आता वाचकप्रेमींचे लक्ष लागले आहे.
ऑनलाईन पुस्तके वाचता येत असली, तरी मात्र हातात धरून पुस्तके वाचण्याचा आनंद निराळाच आहे. वसई साहित्यांची नगरी आहे. अनेक नामवंत लेखक, कवी वसईकरांना लाभले आहेत. सरकारने लवकर कोरोनाचे नियम आखून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देत ज्ञानाची तिजोरी उघडायला हवी.
- प्रकाश पाटील, लेखक, वसईवसई विरार शहरातील नागरिक वाचन करण्यासाठी तसेच अभ्यासक्रमाची पुस्तके उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांची रेलचेल असायची; परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रंथालय, अभ्यासिका व वाचनालये बंदच आहेत. शासनाचा निर्णय झाल्यावर खुली करण्यात येतील.
- अमित मोदी, ग्रंथपाल, वसई विरार शहर महापालिका
(संपादन : वैभव गाटे)
Vasaikar waiting for the locks of the library to be opened
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.