आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात स्थिरता, मुंबईकरांना दिलासा; जाणून घ्या सर्व भाज्यांचे दर

भाग्यश्री भुवड 
Friday, 25 December 2020

मुंबईच्या घाऊक बाजारात गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात स्थिरता आली असून काही मोजक्याच भाज्यांच्या दरात थोडीफार घट झाली आहे.

मुंबई 24 : मुंबईच्या घाऊक बाजारात गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात स्थिरता आली असून काही मोजक्याच भाज्यांच्या दरात थोडीफार घट झाली आहे. मात्र, यामुळे गृहीणींच्या बजेटमध्ये मोठा दिलासा आहे. दरम्यान, घाऊक आणि किरकोळ बाजारात कमी जास्त होणाऱ्या दराचा मोठा फरक जाणवतो अशी भावना काही मुंबईकरांनी व्यक्त केली आहे. गेल्या महिन्याभरापासून बाजारभाव स्थिर असल्याचा विक्रेते, ग्राहक आणि परिणामी शेतकऱ्यांनाही फायदा होत आहे, असेही व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे. 

परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात भाज्यांच्या किंमती वाढल्या होत्या. मात्र, आता बाजारात भाज्यांचे स्थिर झाले असून हिरवा वाटाणाही स्वस्त दरात विकला जातोय. 

>> TRP प्रकरणात 15 वी अटक, बार्कचे माजी CEO पार्थो दासगुप्ता यांना अटक 

भारतातून 524 गाड्या दाखल -

वाशीच्या APMC घाऊक बाजारात दिवसाला किमान 500 हून अधिक गाड्या संपूर्ण भारतातून दाखल होतात. गुरुवारी भाज्यांच्या 524 गाड्या दाखल झाल्या अशी माहिती व्यापारी महासंघ अध्यक्ष कैलाश ताजणे यांनी सांगितले आहे. 

काही भाज्यांमध्ये फरक -

तसेच भेंडी 40 ते 44 रुपये, कोथिंबीर 10 ते15 रुपये जुडी झाली आहे, मात्र किरकोळ बाजारावर कोणाचे नियंत्रण नसल्याने घाऊक बाजारात स्वस्त दरात मिळत असलेला भाजीपाला किरकोळ बाजारात दुप्पट दराने विकला जात आहे.

>> प्रेमात आड येणाऱ्या मित्राचा काढला होता काटा, तब्बल 6 महिन्यानंतर मित्रासह साथीदाराला अटक 

यंदा ऑक्टोबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पुणे, नाशिक जिल्ह्य़ातील भाजीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये येणाऱ्या भाज्यांची आवक घटली होती. आवक घटल्याने ऐन नवरात्रीत भाज्यांच्या दरांमध्ये प्रचंड वाढ झाली होती. मात्र, नोव्हेंबरमहिन्याच्या सुरुवातीपासूनच वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे नाशिक आणि पुणे जिल्ह्याात थंडीचे वातावरण जाणवू लागले आहे. हे वातावरण भाजी पिकांसाठी पोषक असल्यामुळे सध्या मुंबई, ठाणे आणि उपनगरामध्ये भाज्यांची आवक वाढू लागली आहे. मात्र, काही भाज्यांच्या दरात फरक असल्याचेही ताजणे यांनी सांगितले.

एपीएमसी बाजारातील भाज्यांचे दर -

 • कांदा 100 ला 3 किलो (क्वालिटीनुसार ) 25 रुपये ते 28 रुपये किलो
 • मेथी 10 किंवा 12 रुपये जुडी 
 • पालक 10 ते 12 रुपये जुडी
 • हिरवा वाटाणा 18 ते 20 रुपये
 • फ्लावर 5 ते 6 रुपये किलो
 • टाॅमॅटो 18 ते 20 रुपये किलो 
 • गवार 40 ते 44
 • फरसबी 40 ते 44 रुपये प्रतिकिलो
 • फ्लॉवर 6 ते 8 रुपये प्रतिकिलो
 • गाजर 18 ते 20 रुपये प्रतिकिलो
 • भेंडी 40 ते 44 रुपये प्रतिकिलो
 • कोबी 5 ते 6 रुपये प्रतिकिलो 
 • मिरची 24 ते 28 रुपये प्रतिकिलो 
 • काकडी 20 ते 24 रुपये प्रतिकिलो
 • वांगी 20 ते 24 रुपये प्रतिकिलो
 • कोथिंबीर 10 ते 15 रुपये जुडी

>> 50 लाखांची लाच घेणाऱ्या सायन हॉस्पिटलचे उपअधिष्ठाता राकेश वर्मा यांना अटक

हिरवा वाटाणाही झाला स्वस्त - 

काही महिन्यांपूर्वी हिरवा वाटाणा एकट्या दादर मार्केटमध्ये 200 किलोने विकला जात होता. शिवाय अनेक ठिकाणच्या बाजारात तो उपलब्धही नव्हता. विक्रेत्यांनाही तो परवडत नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता तो अनेक छोट्या बाजारात ही उपलब्ध असून बाजारात 50 रुपये किलोने विकला जात आहे. दरम्यान, घाऊक बाजारात हिरवा वाटाणा 18 ते 20 रुपये किलोने विकला जात आहे.

आवक वाढली - 

संपूर्ण भारतातून आता भाज्यांची आवक वाढली आहे. मात्र, काही भाज्यांमध्ये थोडाफार फरक जाणवत आहे. शिवाय, बाजारभाव दोन दोन तासांनी बदलतो. त्यामुळे, गुरुवारी बाजारात राज्यात इतर राज्यातून येणाऱ्या भाज्यांची आवक वाढली आहे.

बेल्जियममधून वाटाणा, जोधपूरमधून गाजरची आवक वाढली आहे. थंडी पडल्यामुळे भाजीपाल्यासाठी पोषक वातावरण आहे. पिक ही चांगल्या पद्धतीचे येत आहे. किमान 40 ते 50 टक्क्यांनी कमी झाले आहेत. पुढचे काही महिने हे भाव असेच कमी राहतील असे एप एमसी घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघ अध्यक्ष कैलाश ताजणे यांनी सांगितले आहे. 

>> लॉकडाऊनमध्ये कुटुंबाची झोपमोड, घोरण्याच्या समस्येत 20 टक्क्यांनी वाढ 

मुंबईत ही भाजीपाल्याचे दर झाले कमी - 

गोरेगावात मंगळवारी कोथिंबीर मोठी जुडी 15 रुपये आणि पालक जुडी 10 रु. फ्लॉवर मोठा गड्डा 20 रुपये किलोने विकला गेला. 

किरकोळ बाजारातील दर -

 • मेथी स्वस्त - 20 जुडी
 • हिरवा वाटाणा 40 रुपये 
 • गाजर - 50 किलो 
 • काकडी - 40 
 • शिमला मिरची - 60
 • कोथिंबीर जुडी -10 ,20 रुपये
 • पालक - 20 जुडी
 • फ्लॉवर - 40 
 • कोबी - 20 किलो
 • टाॅमेटो - 35 ते 40 किलो

मुंबईतील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा | Marathi news from Mumbai  

पालेभाज्या स्वस्त -

पौष महिन्यानंतर पालेभाज्यांचे उत्पादन मोठ्याप्रमाणात होते. त्यानुसार, पालेभाज्या स्वस्त मिळतात. पण, ज्या प्रमाणे घाऊक बाजारात इतर पालेभाज्या स्वस्त किंवा कमी किंमतीत मिळतात त्याचप्रमाणे मुंबईसारख्या शहरात भाज्या स्वस्त मिळत नाहीत असं विनायक खेमाजी सावंत म्हणालेत.

vegetable prices are stable due to increase in supply relief to mumbaikar know prices of all vegetables


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vegetable prices are stable due to increase in supply relief to mumbaikar know prices of all vegetables