

Vegetable Price Hike
ESakal
मुंबई : वाढत्या उष्णतेचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर होत आहे. उष्णतेमुळे भाजीपाला उत्पादन घटले असून परिणामी एपीएमसी बाजारातील पुरवठा कमी झाला आहे. भाव झपाट्याने वाढत आहेत. किरकोळ बाजारात हिरव्या घेवड्याचा भाव २५० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. सुमारे ४०० वाहनांमधून दररोज १,९७० टन भाजीपाला बाजारात पोहोचवला जातो. मात्र, मागणीपेक्षा पुरवठा जास्त असल्याने ही भाववाढ झाली आहे.