ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी दोन एकर जमीन दिली दान!

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी दोन एकर जमीन दिली दान!


मुंबई  : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी स्वतःची एक एकर जमीन वृद्ध कलावंतांसाठी आश्रम बांधण्यासाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाला व आणखी एक एकर जमीन सिने अँड टीवी आर्टिस्ट असोसिएशन (सिंटा) दिली आहे. लॉकडाऊनमध्ये चित्रपट व नाट्यसृष्टीतील हाल होत आहे. तेथील वृद्ध कलाकार, बॅकस्टेज कलाकार यांना मदत करण्यासाठी विक्रम गोखले यांची धडपड सुरू आहे. वृद्ध कलाकारांना त्यांच्या उतरच्या वयात आसारा मिळावा, त्यांचे जीवन सुखी व्हावे यासाठी विक्रम गोखले यांनी पुढाकार घेऊन स्वतःची नाणे गावातील पौड जवळील एक एकर जमीन आश्रम बांधण्यासाठी देत आहे, असे चित्रपट महामंडळाला कळवले. 

विक्रम गोखले यांनी ज्येष्ठ कलावंतांची नेहमी होणारी फरफट पाहिली आहे. त्यासाठी काहीतरी उपाय शोधावा अशी त्यांची कायमच भावना होती. आपली ही मनीषा पूर्ण करण्यासाठी त्यांनी यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला पाठिंबा देत ही जबाबदारी पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी नाणे गावातील पौड जवळील स्वमालकीचा एक एकराचा प्लॉट महामंडळाच्या नावाने करून द्यायचा ठरवले.

आज त्याची बाजारभावानुसार किंमत ही 2.5 कोटी रुपयांपेक्षा कमी नाही. या ठिकाणी महामंडळाने ज्येष्ठ व एकटे राहणाऱ्या कलावंताना आसरा आणि सहारा मिळावा म्हणून ज्येष्ठ कलावंतासाठी मोफत राहण्याची सोय करणेसाठी ही जागा विक्रम गोखले अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला दान करून महामंडळाच्या नावाने करून देण्याची घोषणा केली आहे.अखिल भारतीय मराठी चित्रपटाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी विक्रम गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली हा आश्रम उभा करण्याचे ठरवले असून त्यांनी विक्रम गोखले यांचे आभार मानले आहेत.

विक्रम गोखले यांचे वडिल ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले यांनी दरवर्षी देशाप्रती आपली कृतज्ञता भाव व्यक्त करण्याकरिता आपल्या कमाईतील काही भाग नित्यनेमाने भारतीय सैन्यदलाला मदत म्हणून देयचे. त्यांच्यानंतर विक्रम गोखले यांनी त्यांचा हा स्तुत्य वारसा पुढे चालू ठेवला असून दरवर्षी त्यांनीही हे मदतकार्य चालूच ठेवले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच कलाकार काही ना काही मदत करीत आहेत. विक्रम गोखले यांनी स्वतः मदत तर केली आहेच परंतु बॉलीवूड मधील इतर कलावंतानाही हक्काने मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या सहकलाकारांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.
------


वृद्ध कलावांतींची उतार वयात होणारी फरफऱट विक्रम गोखले यांनी स्वतः पाहिली. त्यांच्या मनात या कलाकारांसाठी खूप आत्मियता आहे. वृद्ध कलाकारांना कोणताही अडचणीशिवाय जगता यावे, यासाठी त्यांनी आश्रमसाठी जागा दिली. त्यांनी मला फोन करून माझी जवळची जागा देत असल्याचे सांगितले. लॉकडाऊननंतर जागेची कायदेशीर कारवाई पूर्ण होऊन त्यानंतर महामंडळ आश्रम बांधण्याच्या  कामाला लागेल.
- मेघराज भोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com