ज्येष्ठ शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा 
Sunday, 17 January 2021

ज्येष्ठ भारतीय शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे आज मुंबईतील बांद्रा येथील राहत्या घरी निधन झाले.

मुंबई : ज्येष्ठ भारतीय शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे आज मुंबईतील बांद्रा येथील राहत्या घरी निधन झाले. दीड वर्षांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता आणि त्यानंतर ते अंथरूणालाच खिळून होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांची कोरोना चाचणीही निगेटिव्ह आली होती. आज दुपारी त्यांचे निधन झाले. 

मुंबई, रायगड ठाणे परिसरातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी क्लिक करा

उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी लता मंगेशकर, आशा भोसले, हरीहरन, मन्ना डे, गीता दत्त, ए. आर. रहमान, सोनू निगम अशा अनेक दिग्गज गायकांना शास्त्रीय संगीताचे धडे दिले होते. भारत सरकारने त्यांना पद्मश्री आणि पद्मविभूषण अशा दोन्ही पुरस्कारांनी सन्मानित केले होते. त्यांच्या निधनाने सर्वांना धक्का बसला असून संगीत सृष्टीतील अनेक मान्यवरांनी त्यांना ट्‌विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे. उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्या पश्‍चात त्यांची पत्नी, मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. आज संध्याकाळी सांताक्रुज येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Veteran classical singer Ustad Ghulam Mustafa Khan passes away