Vidhan Sabha 2019: मी निवडणूक लढवणार; आदित्य ठाकरेंनी केली घोषणा

टीम ई-सकाळ
Monday, 30 September 2019

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नव्हता. आज, खुद्द आदित्य ठाकरे यांनीच या चर्चेला पूर्णविराम देत निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नव्हता. आज, खुद्द आदित्य ठाकरे यांनीच या चर्चेला पूर्णविराम देत निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर आज, वरळीत शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्यातच आदित्य ठाकरे यांनी स्वतः आपली उमेदवारी जाहीर केली. आदित्य ठाकरे यांच्या रुपाने ठाकरे कुटंबातील पहिली व्यक्ती निवडणूक रिंगणात उतरणार आहे. 

बारामतीत पडळकरांच्या उमेदवारीवर शिवसेनेचा वेगळा निर्णय

पक्षप्रमुखांचा होकार घेतलाय
आदित्य ठाकरे म्हणाले, 'मी सिनेटच्या माध्यमातून काम करत होतो. महाराष्ट्रात फिरत होतो. पण, शिवसेनेचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार यांना
पाहिल्यानंतर त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहिलं पाहिजे, असं मला वाटत होतं. मी माझ्या स्वप्नासाठी किंवा मंत्री होण्यासाठी निवडणूक लढवत नाही. तर, मला नवा 
महाराष्ट्र घडवायचा आहे. बेरोजगारी मुक्त, प्रदूषण मुक्त, कर्जमुक्त, सुजलाम सुफलाम महाराष्ट्र मला घडवायचा आहे. त्यासाठी मी निवडणूक लढवणार आहे. मी पक्षप्रमुखांची परवानगी घेतली आहे. आज ते सध्या तिकीट वाटपात बिझी आहेत. तुमचा होकार 
आहे म्हणूनच मी आज निवडणूक लढवणार, असे जाहीर करत आहे.'

दादा हे वागणं बरं नव्हं

'शिवसेना उमेदवाराला मत म्हणजे मला मत'
शिवरायांच्या आणि सर्वच महापुरुषांच्या साक्षीने मी निवडणूक लढवणार, अशी घोषणा आदित्य यांनी केली. ते म्हणाले, 'मी वरळीतून निवडणूक लढवत असलो तरी, आपल्याला वरळी बरोबरच संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. महाराष्ट्र हीच माझी कर्मभूमी आहे. त्यामुळे केवळ वरळीच नव्हे तर, महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसेना उमेदवाराला आपलं मत पडलं पाहिजे. शिवसेना उमेदवाराला मत म्हणजे मला मत. जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलाय.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 aaditya thackeray election announcement shiv sena mumbai worli