Vidhan Sabha 2019 : ‘माझं थोबाड बंद होणार नाही’; राज ठाकरेंच्या सभांना मुंबईतून सुरुवात

Vidhan Sabha 2019 mns chief raj thackeray speech in mumbai goregaon
Vidhan Sabha 2019 mns chief raj thackeray speech in mumbai goregaon

मुंबई : लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपच्या विरोधात रान उठवल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल व्यवहारात ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागलं. त्यानंतर आज, पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी सार्वजनिक सभा घेतल्या. मुंबईत त्यांच्या दोन जाहीर सभा झाल्या त्यात त्यांनी सत्ता नव्हे तर, तुमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सक्षम विरोधीपक्ष द्या, असं आवाहन मतदारांना केलं. तसच ईडीच्या चौकशीमुळे आपण बोलणं थांबवणा नाही, ‘माझं थोबाड बंद होणार नाही’, या वक्तव्याचा पुनरुच्चार केला. गोरेगाव आझाद मैदानामध्ये मनसे उमेदवार विरेंद्र जाधव यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची सभा झाली.

ब्लू फिल्म केली असती तर, बरं झालं असतं
राज ठाकरे म्हणाले, ‘गेल्या निवडणुकीला सामोरं जाताना, महाराष्ट्राच्या विकासाची एक ब्लू प्रिंट केली होती. पण, ती एकदा पाहिल्यानंतर कुणी पाहिलीच नाही. परवा एका पत्रकाराने तुमच्या ब्लू फिल्मचं काय झालं?, असा प्रश्न विचारला होता. मला वाटलं, ब्लू फिल्म काढली असती तर, ती तरी किमान जास्त जणांनी पाहिली असती.’

‘शिवसेनेच्या नादाला लागू नका’
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपसह शिवसेनेला लक्ष्य केलं. पाच वर्षे राजीनामे देण्याची धमकी दिल्याबद्दल राज ठाकरे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली. ‘आमची इतकी वर्षे सडली’, या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याची आठवण करून देताना ‘126 वर अडली ’, असे वक्तव्य केले. शिवसेनेच्या नादाला लागू नका, असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले. मेट्रो कार शेडसाठी आरे जंगलातील झाडांची कत्तल झाली, यावर शिवसेनेने बोटचेपी भूमिका घेतल्याचाही राज ठाकरे यांनी समाचार घेतला. ‘सत्ता आल्यानंतर झाडं वाचवण्यासाठी तिथं झाडं शिल्लक कुठं आहेत? ’, असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला. राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम होते. मग त्यांच्या शिवसेनेने आरेतील वृक्षतोड का थांबवली नाही?, असेही राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे म्हणाले

  1. ज्यांना ईडीच्या धमक्या दिल्या ते भाजपात गेले. मला फरक पडत नाही
  2. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन काय कामाची
  3. दोघेजण सरकार चालवत आहेत; कसलं सरकार चालवत आहेत?
  4. सरकारविरोधात व्यक्त व्हायला हवे म्हणून मनसे निवडणूक रिंगणात
  5. गडकिल्ले लग्न समारंभासाठी देण्यासाठी सरकार निघाले; कोणीही सरकार विरोधात बोलण्यास तयार नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com