Vidhan Sabha 2019 : मुंबईतील प्रचारसभेत पंतप्रधान मोदी शिवस्मारकाविषयी काय म्हणाले? 

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

मुंबई : न्यायालयाकडून हिरवा कंदिल मिळताच, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करू, असे अश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, मुंबईतील जाहीर सभेतून दिले. शिवस्मारकासंदर्भात कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले. मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे महायुतीची प्रचार सभा झाली. यावेळी पंतप्रधान मोदींसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे मंत्री पियूष गोयल, रिपाईंचे रामदास आठवले आदी महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते. 

राज ठाकरेंची 'ती' व्हिडिओ क्लीप तुम्ही ऐकली का?

भाजपचा जन्मच मुंबईत : मोदी 
पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मुंबईला स्वप्नंचे शहर म्हटलं जातं. मध्यमवर्गासाठी स्वतःचं घर हेच मोठं स्वप्न असतं. आधी अनेकांसाठी मुंबईतलं घरं हे खूप मोठं स्वप्न असायचं. रिअल इस्टेटमध्ये ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण नव्हते. आता मध्यमवर्गाला घराचं स्वप्न साकार करण्यासाठी आता अनुदान देण्यात आले. भाजपचा जन्मच मुंबईत झाला. त्यामुळं मुंबईशी आमची नाळ जोडलेली आहे. काँग्रेसच्या काळात मुंबईवर हल्ले झाले. आता दहशतवाद्यांचे धाडस होत नाही.'

शेंडाही नाही बुडकाही नाही, अशी काँग्रेसची अवस्था : उद्धव ठाकरे

आम्ही गरिबांसाठी सेवाभावी वृत्तीने काम करतो : मोदी
नरेंद मोदी म्हणाले, 'अनेक दशकांनंतर महाराष्ट्राला 5 वर्षे कार्यकाळ पूर्ण करणारा मुख्यमंत्री मिळाला. त्यांनी विश्वासू सरकार दिले. गेल्या पाच वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागला नाही. शेतकऱ्यांपासून कार्पोरेटपर्यंत प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण केले जात आहे. महाराष्ट्रातील मागील सरकार अनिश्चिततेच्या गर्तेत होते. कधी कोणाची हकालपट्टी होईल. कधी कोणता मंत्री बदलेले, हे सांगता येत नव्हते. आम्ही गरिबांसाठी सेवाभावी वृत्तीने काम करतो. त्यांना गरिबीसाठी लढण्याचे बळ देतो. आम्ही गरिबांना स्वच्छ पाणी, गॅस अशा अनेक गोष्टी देतो. आजारी पडल्यात पाच लाखापर्यंत विमा देतो. स्वतःसाठी आणि इतरांसाठी रोजगार निर्माण करणाऱ्यांचा आम्ही सन्मान करतो. गुंतवणुकीचे स्वागत करण्याचे सरकारचे धोरण.'

नरेंद्र मोदी म्हणाले...

  1. टॅक्स प्रणालीत सुधारणा करण्याचा सरकारचा प्रयत्न
  2. मुद्रा योजनेतून आम्ही, तरुणांच्या हाताला काम दिले
  3. दहा वर्षे त्यांनी देशाची अर्थव्यवस्था आणि बँकिंग व्यवस्था बिघडवली
  4. आज कोणी तिहार जेलमध्ये तर कोणी मुंबईच्या कारागृहात 
  5. इमानदारांच्या कमाईवर कोणतेही गंडांतर येऊ देणार नाही 
  6. महायुतीच्या सरकारने नवी मुंबई विमानतळाचा प्रश्न मार्गी लावला 
  7. काँग्रेसच्या काळात मेट्रोचे काम कासवाच्या गतीने झाले 
  8. सोळा वर्षांत केवळ 11 किलोमीटरचं काम झालं 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 pm narendra modi speech mumbai rally shivaji maharaj smarak