esakal | सत्तेच्या हालचालींना वेग..! शिवसेना काढणार अपमानाचा वचपा
sakal

बोलून बातमी शोधा

सत्तेच्या हालचालींना वेग..!   शिवसेना काढणार अपमानाचा वचपा

सत्तेच्या हालचालींना वेग..! शिवसेना काढणार अपमानाचा वचपा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पाच वर्षे भारतीय जनता पक्षाच्या सोबत सत्तेत राहून सतत अवमान सहन करणारी शिवसेना यावेळी वचपा काढण्याच्या पवित्र्यात आहे. स्वबळावरील बहुमतापासून 40 जागा दूर असलेल्या भाजपला सहजासहजी सत्ता स्थापन करता येणार नसल्याने शिवसेनेच्या नाकदुर्या काढाव्या लागणार आहेत. मात्र ‘हीच ती वेळ’ असं म्हणत शिवसेना आमदार, नेते व शिवसैनिकांनी महाआघाडीच्या पाठिंब्यानं सरकार बनवा. असा आग्रह शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्याकडे धरला आहे. याबाबतची चाचपणी करण्यासाठी उद्या दुपारी 12 वाजता सर्व शिवसेना आमदारांची बैठक मातोश्रीवर बोलावण्यात आली आहे.

दरम्यान, भाजप व शिवसेनेनंही सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या असून अपक्षांना जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. युतीच्या उमेदवारां सोबत बंड करून विजयी झालेल्या बंडखोर आमदारांचाही भाव वधारला अाहे. 

रोहित पवारांनी आदित्य ठाकरेंना केला फोन अन् म्हणाले...
 

शिवसेनेच्या अनेक आमदार शिवसेनेचाच मुख्यमंत्री हवा अशी भूमिका मांडत आहेत. तर, भाजपच्या सर्व अडचणी सहन करू शकत नाही असा इशारा देत उध्दव ठाकरे यांनी सावध भूमिका घेतली आहे. 

'मातोश्रीवर अपक्ष आमदारांचीही हजेरी' 'शिवसेनेला अपक्ष आमदारांचाही पाठिंबा.'

'मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेऊन पाठिंबा दर्शवण्यासाठी अपक्ष आमदारांनीही हजेरी लावली. विदर्भातील रामटेक विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार आशिष जयस्वाल आणि भंडारा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. निवडणुकीत अपक्ष लढलो असलो तरी आम्ही शिवसेनेसोबतच असल्याचं या अपक्ष आमदारांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं.'

राज्यभरात शिवसेनेच्या विरोधात भाजपने जवळपास 42 जागांवर बंडखोर उभे केले होते. या सर्व बंडखोरांना पक्षाकडून सर्व ताकद दिल्याचाही शिवसेनेच्या नेत्यांचा दावा आहे. त्यामुळे आता परत भाजप सोबत सत्तेत गेल्यास पुढील पाच वर्षे शिवसेनेला सावत्रभावाची वागणूक मिळेल याची धास्ती शिवसेना आमदारांना आहे. 

..आणि राज ठाकरेंनी 'त्याला' दिली स्वतःची खुर्ची
 

या परिस्थितीत काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तर शिवसेने कडून सत्ता स्थापनेचा प्रस्ताव आल्यास जरूर विचार करू. असे स्पष्ट केले अाहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ता स्थापनेत आम्ही लक्ष घातलेलं नाही. जनतेनं आम्हाला विरोधी पक्षाची भूमिका बजावणारा कौल दिल्याचे स्पष्य केले. 

अमित शाह यांचा उद्धव ठाकरेंना फोन; काय बोलले अमित शाह ?
 

दरम्यान, शिवसेनेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मात्र आता भाजपच्या एककेंद्री राजकारणाला बळी पडणार  संकेत दिल्याने सत्तेचं नविन समिकरण पुढे येवू शकते असा गर्भित इशारा दिला आहे.

WebTitle : vidhansabha election results will shivsena take revenge from the past

loading image