विक्रमगड नगर पंचायत मधे महिला राज; नऊ वॉर्ड महिलांसाठी राखीव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रमगड नगर पंचायत

विक्रमगड नगर पंचायत मधे महिला राज; नऊ वॉर्ड महिलांसाठी राखीव

sakal_logo
By
अमोल सांबरे

विक्रमगड : विक्रमगड नगरपंचायतीच्या 17 वॉर्डांची आरक्षण सोडत आज विक्रमगड नगरपंचायत कार्यालयात, प्रांतअधिकारी अर्चना पाटील व नगरपंचायतचे मुख्याधिकारी अजय साबळे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. यावेळी नऊ वार्डात महिला आरक्षण जाहिर करण्यात आले असून हरकती घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या नगरपंचायत एकूण 17 वॉर्ड असून यामध्ये एकूण लोकसंख्या 8 हजार 340 एवढी आहे.

त्यापैकी अनुसूचित जमातीची 5 हजार 363 आहे. तर अनुसूचित जातीची 173 व इतर 2 हजार 804 या लोकसंख्याच्या आधारावर अनुसूचित जमातीच्या 11 जागा आरक्षीत करण्यात आल्या आहेत. अनुसूचित जमाती महिलां वर्ग 6 तर अनुसूचित जमाती पुरुष 5 जागा, सर्वसाधरण वर्गासाठी 6 जागा आरक्षित त्या पैकी 3 जागा महिला व 3 जागा पुरुष या साठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. आज झालेल्या सोडतीमध्ये ज्यांना हरकती नोंदवाच्या असतील त्यांनी दिनांक 12 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर पर्यत नगरपंचायत विक्रमगड येथे हरकती नोंदविता येतील.

हेही वाचा: धरणाच्या पडलेल्या भिंतीच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्षच

अंतिम मान्यता 22 नोव्हेंबर रोजी होणार असुन 23 नोव्हेंबर रोजी या याद्या प्रसिद्ध करण्यात येतील अशी माहिती नगरपंचायतचे मुख्यधिकारी अजय साबळे यांनी माहिती दिली.यात अनुसूचित जमाती महिला वॉर्ड क्रमांक 1, 3, 9, 14, 17, 05 हे वार्ड राखीव असून अनुसूचित जमाती पुरुषांनसाठी वॉर्ड क्रमांक 2, 6, 10, 11, 12 आरक्षित आहे. तर मागासवर्गातील प्रवर्ग महिला वॉर्ड क्र.7, 8, 13 असून मागासवर्गातील प्रवर्ग पुरुष राखीव वॉर्ड 4, 15, 16 आरक्षित करण्यात आले आहेत.

त्या मुले विक्रमगड निवडणुकीचा आखाड्यात उभे राहण्याचा गुड़घ्याला बाशिंग बांधून राहिलेल्या सर्व पक्षीय नेत्याना आता आपल्या पत्नीला निवडणुकिचा रिंगनात उतरावे लागणार आहे.

हेही वाचा: देहू : नगरपंचायत आरक्षण सोडत जाहीर

आरक्षणाचा दिग्गज नगरसेवकांना धक्का:

विक्रमगड नगरपंचायतच्या नगरध्यक्षा प्रतिभा पडवळे या 2016 मध्ये वॉर्ड क्रमांक 2 नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री) मधुन निवडून आल्या होत्या मात्र या वर्षी या वॉर्ड मध्ये अनुसूचित जमाती साठी आरक्षण पडल्याने या वॉर्ड मधुन विद्यमान विक्रमगड नगरपंचायतच्या नगरध्यक्षा प्रतिभा पडवळे यांचा पत्ता कट झाला असुन त्यांना दुसऱ्या वॉर्ड मधुन निवडणुक लढवावी लागेल.

विक्रमगड नगरपंचायतचे विद्यमान उपनरध्यक्ष निलेश (पिंका) पडवळे हे 2016 मध्ये वॉर्ड क्रमांक 3 (नागरीकांचा मागास प्रवर्ग) मधुन निवडून आले होते मात्र या वर्षी या वॉर्ड क्रमांक 3 मध्ये अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव आरक्षण पडल्याने त्याचा या वॉर्ड मधुन पत्ता कट झाला आहे. त्यांना दुसऱ्या वॉर्ड मधुन निवडणुक लढवावी लागणार आहे.

हेही वाचा: कोल्हापूर : भाजपच्या उमेदवाराबाबत दोन दिवसांत शिक्कामोर्तब

विक्रमगड नगरपंचायतचे विद्यमान बांधकाम सभापती महेंद्र पाटील हे वॉर्ड क्रमांक 14 (नागरिकांचा मागास प्रवर्ग) मधुन निवडून आले होते मात्र या वर्षी या वॉर्ड मध्ये अनुसूचित जमाती (महिला) साठी आरक्षण पडल्याने त्याचा ही पत्ता कट झाला आहे. तर नियोजन कर विकास व मागासवर्गीय कल्याण समितीचे विद्यमान सभापती अक्षय अरज हे वॉर्ड क्रमांक 17 (अनुसूचित जमाती) मधुन निवडून आले होते मात्र या वॉर्ड मध्ये अनुसूचित जमाती (महिला) वर्गासाठी आरक्षित झाल्याने त्यांचा ही पता कट झाला आहे. विक्रमगड नगरपंचायतच्या आज पडलेल्या वॉर्ड आरक्षणात अनेक दिग्गज व निवडणुकीच्या तयारीत असलेल्या नगरसेवकांना धक्का बसला आहे. त्यांना नवीन वॉर्ड शोधावा लागणार आहे.

loading image
go to top