मुंबई : विलेपार्ले (पूर्व) भागातील एका १३ मजली निवासी इमारतीला आज सकाळी भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत एका ६३ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून, एक महिला जखमी झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. .विलेपार्ले पूर्व येथील फिरोजशाह मेहता रोडवर असलेल्या 'सुविधा पर्ल' या इमारतीत आज सकाळी ९:५१ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. ही इमारत तळमजला अधिक १३ मजल्यांची असून, आगीचा भडका थेट १३ व्या मजल्यावर उडाला होता. अग्निशमन दलाने या आगीला 'स्तर-१' म्हणून घोषित केले होते..Mumbai Water: मुंबईकरांसाठी अलर्ट! 30 तास पाणीपुरवठा बंद राहणार; नागरिकांना पाणी साठवण्याचे आवाहन, कधी आणि कुठे?.घटनेची माहिती मिळताच मुंबई महानगरपालिकेचे अग्निशमन दल, पोलीस, स्थानिक प्रभागाचे कर्मचारी आणि १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ५ फायर इंजिन,२ जम्बो टँकर,२ अत्याधुनिक वॉटर टँकर,१ हायड्रोलिक प्लॅटफॉर्म आणि १ टर्न टेबल लॅडर अशी यंत्रणा तैनात केली होती दुपारी १२:५२ वाजेपर्यंत अग्निशमन दलाने आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. .नानावटी रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत दोन महिलांना फटका बसला. त्यातील भावना सात्रा (वय ६३ वर्षे) यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.तर अनेरी (वय ३४ वर्षे) यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत..Mumbai Leopard Spotted: मुंबईत बिबट्याचा खुलेआम वावर, भटक्या कुत्र्यावर हल्ला; संपूर्ण घटनेचा Video Viral .आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलीस आणि अग्निशमन दल या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.