
Ganesh Naik And Eknath Shinde
ESakal
डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील तथा नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट झालेली 14 गावे निवडणुकीनंतर पालिकेतून वगळण्यात येतील असे वक्तव्य मंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा केले. त्यांच्या या वक्तव्याने ग्रामस्थ मात्र नाराज झाल्याचे पहायला मिळत असून आपल्या समाजाचेच नेते अशी भूमिका घेत असतील तर काय म्हणावे असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. ग्रामस्थांनी त्यांच्या विधानाचा निषेध करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा ठाम निर्धार केला आहे. यामुळे आगामी पालिका निवडणुकीत 14 गावात भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट व ग्रामस्थ असा कलगीतुरा रंगल्याचे पहायला मिळेल.